शाळेत साकारली अध्ययन कुटी
By Admin | Updated: March 7, 2016 01:30 IST2016-03-07T01:30:36+5:302016-03-07T01:30:36+5:30
डोमाटोला शाळेतील प्रयोग : शिक्षक व आजी-माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य

शाळेत साकारली अध्ययन कुटी
बिजेपार : सालेकसा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम डोमाटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक व आजीमाजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अध्ययन कुटी साकारण्यात आली आहे.
कुटीचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच छाया बडोले होत्या. सध्या शिक्षण विभागाद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा याकरिता राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ज्ञान रचनावाद, डिजीटल शाळा यासारखे उपक्रम राबविले जात आहे. जुन्या कंटाळवाण्या शिक्षण शैलीला बगल देत पूर्वीसारख्या निसर्गाच्या खुल्या वातावरणात मुलांना शिक्षण देण्याचा सुद्धा एक भाग म्हणून डोमाटोला येथील मुख्याध्यापक उरकुळे व वर्गशिक्षक सुनील हरिणखेडे यांनी शाळेच्या अवारातच गवताची सुंदरशी अध्ययन कुटी निर्माण केली आहे. या कुटीत मुलांना खुल्या वातावरणात शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. (वार्ताहर)