शाळेच्या नियोजनाला पालकांचे सहकार्य व संमतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:26+5:302021-02-05T07:50:26+5:30

अर्जुनी-मोरगाव : कोविड-१९ मुळे किमान १० महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत आहे. यामुळे २७ जानेवारीपासून ५वी ...

School planning requires parental support and consent | शाळेच्या नियोजनाला पालकांचे सहकार्य व संमतीची गरज

शाळेच्या नियोजनाला पालकांचे सहकार्य व संमतीची गरज

अर्जुनी-मोरगाव : कोविड-१९ मुळे किमान १० महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत आहे. यामुळे २७ जानेवारीपासून ५वी ते ७वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे शाळेच्या नियोजनाला पालकांचे सहकार्य आणि संमतीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य वीणा नानोटी यांनी केले.

सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंटमध्ये शनिवारी (दि. २३) घेण्यात आलेल्या पालक सभेत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सभेत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, शाळेच्या वेळेचे नियोजन, तासिका अभ्यासक्रम, परीक्षा, गणवेश इत्यादी विषयांवर पालकांसमक्ष चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर पालकांनी सकारात्मकता दर्शविली. शाळेत प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासले जाईल. शाळा परिसर - बेंचेस सॅनेटाईझ केले जातील. एका बेंचवर दोनच विद्यार्थी बसतील, या विषयांवर चर्चा करण्यात आली. पालक सभेला ५२ पालक उपस्थित होते. सभेला पर्यवेक्षक मुकेश शेंडे, ईपीटीए उपाध्यक्ष अरुणा चितलांगे, सहसचिव मंजिरी भाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक मुकेश शेंडे यांनी मांडले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर रोकडे यांनी केले. सभेसाठी ईश्वर बोरकर, अविनाश मेश्राम, भगवती पलिवाल, रिना सय्यद, अश्विनी भावे, भारती परिहार, ज्योती झलके, स्नेहा मेश्राम तसेच परिचर बर्गे, लांजेवार, वलथरे यांनी सहकार्य केले.

Web Title: School planning requires parental support and consent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.