शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दप्तराचे ओझे कमी होईना, शासन आदेशाला बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 04:37 IST

वयानुसार विद्यार्थ्यांवर त्यांच्या दप्तराचे ओझे भारी पडू नये, यासाठी शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले होते.

गोंदिया  - वयानुसार विद्यार्थ्यांवर त्यांच्या दप्तराचे ओझे भारी पडू नये, यासाठी शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले होते. जिल्हा परिषद शाळांत या आदेशाची अंमलबजवणी होत असली तरी खाजगी व अन्य शाळांत मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे.चिमुकल्यांच्या खांद्यावरील दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खांद्यावर दप्तर टांगून शाळेत जात असताना त्यांना ते पेलवत नाही. या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाचा हा निर्णय जिल्हा परिषद, नगर परिषद व खाजगी शाळांसाठीही बंधनकारक होता.जिल्हा परिषदेच्या शाळांत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही उपाय योजना करण्यात आल्या. महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार ‘दप्तर विरहीत दिवस’ म्हणून पाळला जात असल्याची माहिती आहे. मात्र खासगी शाळांकडून या निणर्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. आजही खाजगी शाळांतील अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचा खच अधिक आहे. केजीतील चिमुकल्यांच्या वह्या-पुस्तके बघता ते महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचा भास होतो.शिक्षण विभागाकडून सुध्दा या निणर्याची शाळांकडून योग्य अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पडताळणी केली जात नाही. त्यामुळे खासगी शाळांचे मनमानी धोरण कायम आहे.खासगी शाळा नियमांवर वरचढविद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करता यावे यासाठी महिन्याचा चौथा शनिवार दप्तर विहरीत दिवस म्हणून घेण्याचे ठरले. जिल्हा परिषदेच्या शाळांत मागील सत्रात हा उपक्रम राबविण्यात आला. मात्र खाजगी शाळांत याला बगल देण्यात आल्याचेही दिसले. दप्तर विरहीत दिवसाला विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कार्यक्रम आयोजीत करून त्यातून अभ्यास करणे अपेक्षीत होते. मात्र खाजगी शाळांत तसे काहीच झाले नाही व यंदाही होणे अपेक्षीत नाही. यातून खाजगी शाळांवर नजर ठेवून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करवून घेणे गरजेचे असल्याचे वाटते. कारण खासगी शाळा नियमांवरच वरचढ होत आहे.पाठीवर ओझं असल्याने पाठीच्या हाडांचा त्रास होऊ शकतो. पुढे जाऊन स्लीप डिस्क व त्यामुळे हात-पायांना कमजोरी येऊ शकते. दप्तराचे ओझे पाठीवर राहत असल्याने मानेला व सोबतच खांद्यांनाही त्रास होतो व कुबड निघू शकते. यापासून मानसीक त्रासही उद्भवतात. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.- डॉ. प्रदीप गुजर, बाल रोग विशेषतज्ञ जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षकांकडून हा उपक्रम राबविला जातो. यासाठी २०१७ मध्ये परिपत्रक काढले होते. आता यंदाही सर्व शाळांचा आढावा घेऊन या उपक्रमाची काटेकोरपण अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊ. खासगी शाळांनाही त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प.,गोंदिया

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी