बकीटोला परिसरात बिबट्याची दहशत
By Admin | Updated: February 21, 2016 01:00 IST2016-02-21T01:00:44+5:302016-02-21T01:00:44+5:30
या परिसरातील ग्राम बकीटोला-गोंगले या परिसराला लागूनच नागझिरा अभयारण्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाशेजारी येत असतात.

बकीटोला परिसरात बिबट्याची दहशत
पांढरी : या परिसरातील ग्राम बकीटोला-गोंगले या परिसराला लागूनच नागझिरा अभयारण्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाशेजारी येत असतात. या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी रबी पिकाची लागवड केली आहे व चुलबंद जलाशयाचे पाणी सोडल्यामुळे प्राणी, पाणी पिण्याकरिता गावाशेजारी येत आहेत.
या भागामध्ये बिबट्याचे आगमन झाल्याचे गावकऱ्यांना आढळले. काही प्राण्यांचे मांस खाऊन अर्धवट ठेवले तर काही मांस झाडावर टांगले असल्याची काही नागरिकांनी पाहीले. त्यामुळे या भागामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परंतु गावातील पाळीव जनावरांची कोणतीही हानी झालेली नाही. याविषयी येथील वनरक्षकांसोबत बोलले असता त्यांनी अशा प्रकारची घटना झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे वनकर्मचारी या घटनेबद्दल अनभिज्ञ असण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिसरात चौकशी करुन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)