शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

जिल्ह्यात ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती

By admin | Updated: January 5, 2017 00:56 IST

निर्मल पॅरामेडीकल महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. प्रमुख पाहुणे म्हणून भारती राठोर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकले.

 गोंदिया : क्रांतीज्योती व पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. निर्मल पॅरामेडिकल कॉलेज गोंदिया : निर्मल पॅरामेडीकल महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. प्रमुख पाहुणे म्हणून भारती राठोर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकले. यशस्वीतेसाठी डॉ. स्वप्नील सावजी, डॉ. मनिषा मिश्रा, आनंद पडोले, अखिलेश, ललीत, राधे, सचिन व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. श्री राजस्थान कन्या विद्यालय गोंदिया : श्री मारवाडी युवक मंडल द्वारे संचालित श्री राजस्थान कन्या विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात प्रथम स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण पर्यवेक्षिका संगीता एस. राजपूत यांनी केले. विद्यार्थिनींनी गीत व भाषणांच्या माध्यमातून सावित्रीबार्इंच्या कार्याची माहिती दिली. संचालन राखी खंडेलवाल यांनी केले. यशस्वितेसाठी कर्मचारी व विद्यार्थीनींनी सहकार्य केले. डॉ.आंबेडकर विद्यालय गोंदिया : डॉ. आंबेडकर विद्यालय कुंभारेनगर येथे आद्य शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली. त्यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. मुख्याध्यापक व्ही.आर.सोरते यांनी सावित्रीबार्इंनी केलेल्या विविध सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. संचालन शिक्षक व्ही.आर. बागडकर यांनी केले. व्ही.ए.बागडे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. यशस्वितेकरिता कर्मचारी व्ही.एम. रोकडे व ए.पी. कठाणे यांनी सहकार्य केले. के.एम. कोल्हाटकर कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया : के.एम. कोल्हटकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसोली येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राविण्य विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत कापी व पेनचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी विजय टेंभरे, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य व्ही.सी. टेंभरे, प्रा.भूमेश्वरी, प्रा.सीमा पटले, प्रा.अजय वाढई, गीता गणवीर, नितेश बोरकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या जीवनाप्रसंगी भाषण, गीत सादर केले. संचालन प्रा.सीमा पटले यांनी केले. आभार प्रा.अजय वाढई यांनी मानले. जीईएस हायस्कूल व कला, विज्ञान महाविद्यालय गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित जीईएस हायस्कूल आणि कला, विज्ञान महाविद्यालय पांढराबोडी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती ए.जी. टेंभरे यांच्या अध्यक्षस्थानी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एस.सी. सुंकरवार, प्रा.सुनील लिचडे, विनोद माने, ए.पी. मानकर उपस्थित होते. संचालन एम.एस. राणे यांनी तर आभार रोशनी सुलाखे यांनी मानले. यशस्वितेसाठी एस.पी. हिरापुरे, एन.ए.बुराडे, एस.एन. मोरगडे, एस.एच. पोरचट्टीवार, के.ओ.कावळे, एम.सी. कोल्हाटकर, आर.बी. दमाहे, टी.एम.दास, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पशीने विद्यालय दासगाव गोंदिया : श्रीमती अनुसयाबाई पशीने विद्यालय व अर्चना पशीने कनिष्ठ महाविद्यालय दासगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती लेक वाचवा लेक शिकवा दिनाच्या रुपात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्या वंदना बिसेन, प्रमुख पाहुणे म्हणून के.एस. बिसेन, ए.के.आर. शेख, आर.एम. नागपुरे, टी.के. बावनकर, एन.पी. बिसेन, डी.टी. रहांगडाले, पी.जी. नेवारे, डी.आर.राठोड, एस.पी. उईके, ए.टी. तिडके, योगीता ढेकवार, एम.एस. बिसेन, आर.एस. जगने, आर.झेड. गौतम, देवेश उके,पी.पी.चव्हाण, एस.के. मोहनकर, के.एस. येवले, एम.एन. गजभिये, एन.जी. बिसेन, रामू बरमुंशी, दीपक राऊत उपस्थित होते. संचालन शिवानी तुरकर यांनी केले. दादाजी शिक्षण संस्था गोंदिया : दादाजी शिक्षण संस्था मराराटोली गोंदियाद्वारे साईनगर मरारटोली येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती संस्थेचे सचिव निरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून अध्यक्ष ज्योत्सना भालाधरे, सहसचिव विश्रांती थूलकर उपस्थित होते. यशस्वितेसाठी सागर मेश्राम, लक्ष्मी रामटेके, वंदना पटले, बबीता भालाधरे, अल्का खोब्रागडे, अंजली मलगान, सुषमा माने, सुचिता धमगाये, ललिता बिसेन, चिठू, सेजू, साची, प्राची, लता सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट आॅफ फार्मसी गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट आॅफ फार्मसी (बी.फार्म) येथे रासेयोद्वारे प्राचार्य नितीन इंदुरवाडे, प्रा.सुनील चौधरी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई जयंती साजरी करण्यात आली. डॉ. वंजारी, अभिषेष पुरोहित, तुरस्कर, खान, खंडेलवाल, रितीन पारधी, मेश्राम, सोनाली ठाकरे उपस्थित होते. संचालन प्रा.सुनील चौधरी यांनी तर आभार प्रा.भूमेश वंजारी यांनी मानले. जि.प.प्राथमिक शाळा बोदा तिरोडा : जि.प. उच्च प्राथमिक शाळा बोदा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमांतर्गत लेक शिकवा, लेक वाचवा अभियान राबवून गावातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर मुख्याध्यापक गिऱ्हेपुंजे यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी