शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

सटवाचे गावकरीच झाले त्यांच्यासाठी देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 5:00 AM

त्या धान्याची ज्या गावकऱ्यांना गरज नाही म्हणून कुणी किलोभर तर कुणी पाच किलो तांदूळ रेशन दुकानाच्या पुढेच ठेवलेल्या ड्रममध्ये जमा केले.दिवसभरात पावने तीन क्विंटल तांदूळ गावकऱ्यांनी जमा करीत हातोहात गावातील अती गरजू कुटुंबाना देण्यात आले. या महादानाने सारं गावं काही वेळासाठी ऐकमेकांसाठी कृतज्ञ झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

ठळक मुद्देहे महादान नव्हे खरी माणुसकी : सटवा ग्रामपंचायतचा उपक्रम,गरजूंना दिले धान्य

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : आपल्या जवळच्या लोकांची खरी ओळख संकटकाळात होत असते.कदाचित हे तेवढेच खरे सुध्दा असावे. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची मोठी परवड झाली आहे. अशांच्या मदतीसाठी काही सामाजिक व स्वंयसेवी संस्था, लोकप्रतिनिधी धावून जात आहे.मात्र आपल्या मिळालेल्या अन्नधान्याची सध्या आपल्याला गरज नाही. आपल गाव म्हणजे आपल कुटुंबच होय. त्यामुळे यातील काही अन्नधान्य गरजूंना दिले तर त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. नेमकी हीच भावना तालुक्यातील सटवा येथील गावकऱ्यांनी जपत आपल्या गावातील गरजूंना अन्नधान्याची मदत केली. त्यामुळे गावकरीच गावातील गरजूंसाठी खरे देवदूत झाल्याचे चित्र पाहयला मिळाले.कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या लाकडाऊनच्या संकटामुळे एकीकडे नागरिकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तर दुसरीकडे देणाºया देत जावे व घेणाऱ्या घेत जावे असे चित्र आहे. मात्र तालुक्यातील ग्रांमपंचायत सटवा येथील नागरिकांनी जो आदर्श पुढे ठेवला आहे. तो कल्पनेच्या पलीकडे आहे.भुकेच्या पलीकडे जाऊन महादान नव्हे तर माणूसकी जपली आहे. एक पूर्ण पोळी खाणे म्हणजे विकृती व तीच पोळी अर्धी अर्धी वाटून खाणे म्हणजे संस्कृती. हीच संस्कृती सध्या सटवा गावात जपली जात आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ वाटप केले. पण सटवा ग्रामपंचायतमध्ये सरपंच विनोद पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना मिळालेले तांदूळ स्वत:लाभार्थ्यांनी अति गरजू कुटुंबाना देत गावात स्वत:चा आदर्श निर्माण केला आहे. शासनाने गरजू शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ वाटप केले.त्या धान्याची ज्या गावकऱ्यांना गरज नाही म्हणून कुणी किलोभर तर कुणी पाच किलो तांदूळ रेशन दुकानाच्या पुढेच ठेवलेल्या ड्रममध्ये जमा केले.दिवसभरात पावने तीन क्विंटल तांदूळ गावकऱ्यांनी जमा करीत हातोहात गावातील अती गरजू कुटुंबाना देण्यात आले.या महादानाने सारं गावं काही वेळासाठी ऐकमेकांसाठी कृतज्ञ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. संकटे येतात आणि जातात पण या संकटप्रसंगी जी माणसे उभी असतात ती अविष्कार घडविणारी असतात. सटवा या अकराशे लोकवस्तीच्या गावाने जे काही महादान केले ते अनेकांना विचार करण्यास लावणारे आहे. या गावात १३५ बीपीएल, ९३ अंत्योदय व २२ सामान्य लाभार्थी आहेत. या कार्डधारकांना मंगळवारपासून मोफत तांदूळ वाटप झाले. पाहता-पाहताच अनेकांनी महादान करून सामाजिक बांधिलकी जपली. कोरोनाचे महाभयंकर संकट माणसांच्या जिवावर उठले आहे. अशावेळी आपसातले वैर विसरून गावकऱ्यांनी एकसंघ राहीले पाहीजे ही सरपंचाची विचारसरणी जगण्यातले खरे मर्म सांगणारी आहे. सटवा हे शासनाच्या सर्वच योजनेची अंमलबजावणी करणारे गाव.या गावातील नागरिक थोड्या-थोड्या मिळकतीत आपल्या जीवनाचा व कुटूंबाचा रहाटगाडा हाकलत असतात. रोज मिळेल रोज भागेल या मुलमंत्राची गाठ बांधून सटवा जगतोय,अभिमानाने गावची इज्जत गावातच राखून कुणालाही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत