सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा २१ एप्रिल रोजी

By Admin | Updated: April 8, 2015 01:35 IST2015-04-08T01:35:46+5:302015-04-08T01:35:46+5:30

मंगळवार (दि.२१) अक्षयतृतियेच्या पर्वावर प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टद्वारे कामठा येथे सर्वधर्म सामूहिक विवाह आ. गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे.

Sarvharm mass marriages ceremony on 21st April | सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा २१ एप्रिल रोजी

सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा २१ एप्रिल रोजी

गोंदिया : मंगळवार (दि.२१) अक्षयतृतियेच्या पर्वावर प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टद्वारे कामठा येथे सर्वधर्म सामूहिक विवाह आ. गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे. मागील वर्षी कामठा येथे ३५ पेक्षा अधिक युगुल परिणयबद्ध झाले होते. यावर्षीच्या सामूहिक विवाह समारंभासाठी २१ पेक्षा अधिक युगलांची नोंदणी झालेली आहे.
सामूहिक विवाहासाठी नवयुगलांच्या नोंदणीचे काम आ. गोपालदास अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू आहे. सामूहिक विवाहात परिणयबद्ध होणाऱ्या पात्र युगलांना राज्य शासनाच्या शुभमंगल योजनेंतर्गत १० हजार रूपये प्रति युगल अनुदान देण्यात येईल. आंतरजातीय विवाह केल्यास वर-वधूला महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे ५० हजार रूपये अतिरिक्त अनुदान मिळवून देण्यात येईल, त्यासाठी वर किंव वधू कोणतेही एक पक्ष एसटी किंवा एसटी असणे आवश्यक आहे. सदर सामूहिक विवाह समारंभात विवाहबद्ध होणाऱ्या युगलांना आ. गोपालदास अग्रवाल यांच्याकडून सोन्याचा मंगळसूत्र, गृहोपयोगी भांडी संच, टेबल पंखा, सुटकेस आदी भेटस्वरूप देण्यात येईल.
कामठा येथील सामूहिक विवाहाच्या अधिक माहितीसाठी रजनी नागपुरे, सावलराम महारवाडे, कौशल्या खरकाटे, टिकाराम भाजीपाले, संतोष घसरेले, डॉ. महेंद्र गेडाम, सत्यम बहेकार यांच्याशी संपर्क साधावा. (वार्ताहर)

Web Title: Sarvharm mass marriages ceremony on 21st April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.