सरपंचाने केली विद्युत सहायकाला मारहाण
By Admin | Updated: November 1, 2015 02:18 IST2015-11-01T02:18:51+5:302015-11-01T02:18:51+5:30
ग्रामपंचायत कार्यालय तिडका येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या विद्युत सहायक दिलीप राठौड यांना सरपंच ...

सरपंचाने केली विद्युत सहायकाला मारहाण
कर्मचाऱ्याची तक्रार : सरपंचावर गुन्हा दाखल
सडक-अर्जुनी : ग्रामपंचायत कार्यालय तिडका येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या विद्युत सहायक दिलीप राठौड यांना सरपंच व ुइतर तीन व्यक्तींनी लाताबुक्यांनी मारहाण केली. ही घटना गुरूवारच्या दुपारी १२.३० वाजता दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय तिडका येथे घडली.
विद्युत सहायक आणि इतर कर्मचारी दि. २९ आॅक्टोबरला १२.१५ वाजता ग्रामपंचायत कार्यालय तिडका येथे वीज बिल वसूलीकरिता गेले असता त्या ठिकाणी असलेले तिडकाचे सरपंच गंगाधर सोनवने यांच्याशी हुज्जत घातली.
यावेळी वीज बिल भरत नसल्यामुळे सहायक अभियंता व्ही.आर. दलाल यांनी वीज कनेक्शन काढून टाकण्याचे आदेश विद्युत सहायक दिलीप राठौड यांना दिले. विद्युत सहायक वीज कनेक्शन बंद करण्यासाठी खांबावर चढायला जात असतांना त्या सहायकाला सरपंच गंगाधर सोनवने, वाल्मीकी पेटकुले, ज्ञानेश्वर सोनुले, सुभाष माहुर्ले यांनी शिविगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली.
दिलीप राठौड यांनी सदर मारहानीची तक्रार डुग्गीपार पोलीस ठाण्यात केली. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मारहाण करणाऱ्या सरपंच आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंदविला जाणार नाही. तोपर्यंत विद्युत महामंडळाचे कामकाज केले जाणार नाही, असा पवित्रा कार्यकारी अभियंता ए.डी.दखने, कनिष्ठ अभियंता व्ही.आर. दलाल, वरिष्ठ तंत्रज्ञ टी.के.भक्ते, व्ही.एस.कोरबेते, एस. एस. झिंगरे, टी.व्ही.भेंडारकर, ए. एन. जीवनकर, व्ही.सी.बडोले, विजय राऊत, कुथे, पुरन उके, मुन्ना सेगर, देवदास झिंगरे, तुळशीराम लंजे यांनी दिला होता. (तालुका प्रतिनिधी)