सरस्वती मंडळाने घडविला दांडियाद्वारे स्त्रीशक्तीचा जागर

By Admin | Updated: October 3, 2014 01:42 IST2014-10-03T01:42:56+5:302014-10-03T01:42:56+5:30

महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर येणारा उत्सव म्हणजे नवरात्र. नवरात्रातील नऊ दिवस आदिशक्ती दुर्गापूजनासाठी अत्यंत महत्वाचे असतात.

Saraswati Board created a Jagar of feminization through Dandiya | सरस्वती मंडळाने घडविला दांडियाद्वारे स्त्रीशक्तीचा जागर

सरस्वती मंडळाने घडविला दांडियाद्वारे स्त्रीशक्तीचा जागर

अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर येणारा उत्सव म्हणजे नवरात्र. नवरात्रातील नऊ दिवस आदिशक्ती दुर्गापूजनासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या नवरात्रात फार मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी रेलचेल असते. उत्सवातील आवडता कार्यक्रम म्हणजे दांडिया नृत्य. येथील सरस्वती मलिहा मंडळाव्दारे दरवर्षीप्रमाणे सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात दांडिया नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी सुशीलादेवी भुतडा, कृष्णादेवी भैय्या, सरस्वती क. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य वीणा नानोटी, ललीता भुतडा, ममता भैयञया, भावना मंत्री, सुचित्रा जोशी, डॉ. सुनिता कापगते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथीच्या हस्ते देवी दुर्गामातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण १२ दांडीया नृत्य संघाने भाग घेतला. दांडीया नृत्यातील संघानी अप्रतिम नृत्य सादर करून रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पालीवाल ग्रुप, व्दितीय क्रमांक अष्टविनायक ग्रुप व तृतीय क्रमांक जय संतोषी मॉ या संघाने पटकाविला. मुलींचा गटात प्रथम सिध्दीविनाय ग्रुप, व्दितीय डॅझलिंग ग्रुप, तृतीय गोल्डन ग्रुप पुरस्काराचा मानकरी ठरला. या प्रसंगी कलाशिक्षक रुपराम धकाते यांनी रेखाटलेली आदिशक्ती दुर्गामातेची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचया पर्यवेक्षिका छाया घाटे, प्रा. नंदा लाडसे, अर्चना गुरूनुले, माधुरी पिलारे, शितल राऊत, उषा मेश्राम, दिपाली कोट्टेवार, मंदा रहांगडाले, चेतना गोस्वामी, भाग्यश्री सिडाम, कल्पना भुते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जवळपास दोन हजार महिलांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Saraswati Board created a Jagar of feminization through Dandiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.