संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST2021-03-07T04:26:23+5:302021-03-07T04:26:23+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच होमेंद्र भांडारकर व कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून पोलीस पाटील मनोहरसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे ...

Sant Shiromani Ravidas Maharaj Jayanti celebration | संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी

संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच होमेंद्र भांडारकर व कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून पोलीस पाटील मनोहरसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सर्व ग्रा.पं. सदस्य, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष राधेश्याम तावाडे, ग्रामविकास अधिकारी बागळकर उपस्थित होते. सर्वांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या छायाचित्राचे पूजन केले. त्याचप्रमाणे सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे माल्यार्पण करून पूजन केले. कार्यक्रमाचे संचालन मनीष बालभद्रे यांनी केले, तर आभार नरेंद्र बरईकर यांनी मानले. संत शिरोमणी रविदास महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बाबुलाल बरईकर, उपाध्यक्ष जितेंद्र जगणे, सचिव नरेंद्र बरईकर, संतोष बरईकर, राजकुमार चव्हाण, रमेश बरईकर, नामदेव बरईकर, भाऊलाल बरईकर, विनोद चव्हाण, धर्मेंद्र जगणे, सुरेंद्र बरईकर, लीला जगणे, ऊर्मिला बरईकर, अंफा बरईकर, पद्मावती बरईकर, इंदिरा जगणे, सत्यशीला बरईकर, आशा बरईकर, नीलम चव्हाण, राजेश्वरी जगणे व सर्व सदस्य, चर्मकार समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Sant Shiromani Ravidas Maharaj Jayanti celebration