संत नरहरी महाराजांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST2021-03-07T04:26:01+5:302021-03-07T04:26:01+5:30
नवेगावबांध : संत नरहरी महाराज चौदाव्या शतकातील थोर संत होऊन गेले. त्यांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले. त्यांच्या शिकवणीवरच ...

संत नरहरी महाराजांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले ()
नवेगावबांध : संत नरहरी महाराज चौदाव्या शतकातील थोर संत होऊन गेले. त्यांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले. त्यांच्या शिकवणीवरच आज संपूर्ण समाज वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
नवेगावबांध येथे संत श्री नरहरी महाराज सोनार समाजभवन लोकार्पण सोहळा व पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. २५१५ लेखाशिर्षा अंतर्गत सोनार समाजभवन तयार करण्यात आले. या वेळी सोनार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप रोकडे, कार्याध्यक्ष मधुकर कावळे, प्राध्यापक भजे, नरेंद्र भुजाडे, अशोक काळबांधे, हेमंत पोगडे, अमृतलाल यावलकर, रचना गहाणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, सामाजिक कार्यकर्ता खुशाल काशिवार, मुलचंद गुप्ता, अण्णा डोंगरवार, संतोष नरुले, जगदीश पवार, सतीश कोसरकर, बाबूराव नेवारे, रेवचंद शहरे, मधुकर कावळे, होमराज पुस्तोडे, संजय खरवडे आदी उपस्थित होते. सोनार समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर स्पर्धा सुरू झाल्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन समाज संघटना मजबूत करून पुढील वाटचाल करावी, असे बडोले यांनी सांगितले. संत हे कोणत्याही एका जाती समूहाचे नसतात. ते सर्व मानव समाजासाठी प्रेरणास्थान असतात, सध्याची पिढी ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी आहे, असे मत नरुले यांनी व्यक्त केले. समाजाने संघटित होऊन सहकार्याने समाज हितासाठी कार्य करावे तरच आपला समाज सद्य:स्थितीवर मात करू शकेल, असे मत डॉ. प्रदीप रोकडे यांनी मांडले. संत नरहरी महाराज यांच्या छायाचित्राचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कीर्तनकार हाडगे महाराज पिंपरीवाले यांच्या सुमधूर वाणीतून गोपाल काला करण्यात आला. स्थानिक श्री संतोषी माता भजन मंडळ व जय दुर्गा भजन मंडळ यांनी सहकार्य केले. या वेळी रांगोळी स्पर्धा व बालकांची विविध वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली. प्रास्तविक अध्यक्ष कृष्णराव गजापुरे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर यांनी केले तर आभार हाडगे महाराज यांनी मानले. कार्यक्रमासाठी जनार्दन पोवळे, हरिभाऊ पोवळे, त्र्यंबक बेहरे, दिलीप पोवळे, पुरुषोत्तम रोकडे, प्रदीप गजापुरे, लायकराम फाये, स्वाती गजापुरे, सरोज पोवळे, स्नेहल गजापुरे, अर्चना टेटे, सुनंदा फाये, संध्या गजापुरे, दीपा खरवडे यांनी सहकार्य केले.