संस्काराचे धडे आवश्यक
By Admin | Updated: December 16, 2015 02:01 IST2015-12-16T02:01:52+5:302015-12-16T02:01:52+5:30
मुलांना बालपणापासून चांगल्या संस्कारांचे धडे दिल्यास ते पुढे जबाबदार नागरिक बनू शकतात. म्हणून मुलांंना लहानपणापासून संस्काराचे धडे देणे आवश्यक आहे,...

संस्काराचे धडे आवश्यक
देवराज वडगाये : लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण
सालेकसा : मुलांना बालपणापासून चांगल्या संस्कारांचे धडे दिल्यास ते पुढे जबाबदार नागरिक बनू शकतात. म्हणून मुलांंना लहानपणापासून संस्काराचे धडे देणे आवश्यक आहे, असे उद्गार जि.प.गोंदियाचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांनी व्यक्त केले.
सालेकसा येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंटमध्ये लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
लोकमतद्वारे आयोजित संस्काराचे मोती स्पर्धा २०१५ अंतर्गत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस विद्यानिकेतन कॉन्व्हेंटमध्ये वितरित करण्यात आले. यात विद्यानिकेतन कॉन्व्हेंट, पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा येथील विजयी स्पर्धंकाना बक्षीस देण्यात आले.
अध्यक्षस्थानी जि.प.चे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये होते. अतिथी म्हणून सालेकसा तालुक्याचे वन परिक्षेत्राधिकारी एस.जी. अवगान, कृती समितीचे अध्यक्ष व ग्रा.पं. सदस्य ब्रजभूषण बैस, पूर्ती पब्लिक संस्थेचे संचालक सचिव राजेंद्र बडोले, प्रा. त्रिपाठी, लोकमतचे तालुका प्रतिनिधी विजय मानकर, लोकमत समाचारचे तालुका प्रतिनिधी गणेश भदाडे, मुख्याध्यापिका रीना कदम आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मांडताना लोकमतचे तालुका प्रतिनिधी विजय मानकर यांनी संस्काराचे मोती स्पर्धेबद्दल माहिती सादर केली. याप्रसंगी वडगाये म्हणाले, मुलांमध्ये संस्कार घडविण्यासाठी आई-वडील यांच्याबरोबर शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते. यात लोकमत वृत्तपत्रसमूह हे उपक्रम राबवून स्तुत्य कामगिरी बजावत आहे. याप्रसंगी एस.जी. अवगान, राजेंद्र बडोले, ब्रजभूषण बैस आणि गणेश भदाडे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस तसेच प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले.
विद्यानिकेतन कॉन्व्हेंटमधून प्रथम पुरस्कार आयुष राजेंद्र वऱ्हाडे यास हेलिकॉप्टर, द्वितीय साक्षी मधुकर मुनेश्वरला रिमोटकार आणि तृतीय ऋषी ब्रजभूषण बैसला टिफीन बॉक्स देण्यात आले.
पूर्ती पब्लिक स्कूलमधून प्रथम बक्षीस नेहा गजानन भेंडारकर याला हेलिकॉप्टर, द्वितीय आयुष देवेंद्र चौधरी याला रिमोट कार आणि तृतीय हर्षल हेमंत पटले याला टिफीन बॉक्स देण्यात आले. त्याचबरोबर इतर प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून थर्मास देण्यात आले. थर्मास प्राप्त करणाऱ्यांमध्ये भारती यादवराव गौतम, देवयानी गजानन कावळे, समस्त विजय जांभूळकर, देवाशिष हरिष पटले, खुशी देवेंद्र असाटी, संस्कार जयकुमार राऊत, धनश्री उत्तम मलखांबे, जानव्ही राजू बोपचे, हितैषी रामचंद लिल्हारे, विशाल यादवराव गौतम, प्रीतेश रवी सोनटक्के, साहिल सुरेश कस्तुरे, प्रणवी राजेशकुमार प्रधान, रोमी लक्ष्मण घरत, स्नेहल फुलचंद शेंडे, वेदिका प्रेमलाल वाघाडे, मोहीत श्यामसुंदर राठी, अमोल विजय मानकर, श्रीराम व्ही.कोरे यांचा समावेश आहे.
संचालन लोकेश चन्ने यांनी केले. आभार रिना कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी रुपलता साखरे, नीता बोपचे, भूमिता पटले, रिषीका मच्छिरके, लता चौधरी, सीमा मच्छिरके, चंद्रिकापुरे, गोंडाणे, जाधव, विनिता फरकुडे, पूनम ठाकरे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)