मुख्य मार्केट यार्डमध्ये सॅनिटायझर फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST2021-05-25T04:33:01+5:302021-05-25T04:33:01+5:30
कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले. परंतु अतिआवश्यक सेवेचा भाग असल्याने भाजीबाजार सुरू होता. गोंदिया ...

मुख्य मार्केट यार्डमध्ये सॅनिटायझर फवारणी
कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले. परंतु अतिआवश्यक सेवेचा भाग असल्याने भाजीबाजार सुरू होता. गोंदिया शहरात असलेल्या स्व. मनोहरभाई पटेल मुख्य मार्केट यार्ड येथून मोठ्या प्रमाणात भाजीपाला इतरत्र पुरविला जातो. त्यामुळे येथे व्यापारी, विक्रेते व खरेदीदारांची मोठी गर्दी होत असते. अशात येथे कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता संचालक अग्रवाल, नगरसेवक सुनील तिवारी, विवेक मिश्रा यांच्या पुढाकाराने नगर परिषद सॅनिटाझेशन व्हॅनच्या माध्यमातून संपूर्ण यार्ड परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
उल्लेखनीय असे की, स्व. मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड येथे धान खरेदी-विक्रीचे ४ शेड, भाजी बाजाराचे ५ शेड, कार्यालय, धरमकाटा आदी उपलब्ध आहेत. या संपूर्ण परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. यासाठी मार्केट यार्ड ग्रेनमार्केट आढतिया व्यापारी संघाचे अध्यक्ष आनंद बरडिया, अरुण वाढई, राकेश अग्रवाल, थोक फळ भाजी व्यापारी संघाचे अध्यक्ष राकेश ठाकूर, मनोज डोहरे, गणेश भुते, मुकेश गुप्ता, संदीप डोहरे, संतोष कपूरवाणी, अरुण शुक्ला, मेंढे बंधू तथा समस्त अडत्या, व्यापाऱ्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी समितीचे कनिष्ठ लिपिक भुवन पटले, जी.डी. पटले, हरीश तिवारी, विजय चौधरी, संतोष तिराले, राकेश द्विवेदी, राजेश रहांगडाले, योगेश आमकर, अतुल हरिणखेडे, रवी चौधरी, एच.सी. पटले उपस्थित होते.