मोक्षधामात राबविले स्वच्छता अभियान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST2021-08-23T04:30:51+5:302021-08-23T04:30:51+5:30

गोरेगाव : मोक्षधाम सेवा समितीच्या वतीने स्थानिक मोक्षधामात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांना ...

Sanitation campaign implemented in Moksha Dham () | मोक्षधामात राबविले स्वच्छता अभियान ()

मोक्षधामात राबविले स्वच्छता अभियान ()

गोरेगाव : मोक्षधाम सेवा समितीच्या वतीने स्थानिक मोक्षधामात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांना ट्री गार्ड लावून संरक्षण करण्याचा उपक्रम रविवारी (दि.२२) राबविला.

दोन आठवड्यांपूर्वी मोक्षधाम सेवा समितीच्या वतीने ११ पिंपळाची झाडे लावण्यात आली होती. यातील दोन झाडे काही समाजकंटकांनी उपटून फेकली. त्यामुळे या प्रकाराचा समितीच्या सदस्यांनी निषेध नाेंदविला. स्वच्छता मोहीम व ट्री गार्ड लावल्यानंतर समितीची मोक्षधाम परिसरात सभा घेण्यात आली. सभेत विविध विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मोक्षधाम सेवा समितीचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, उपाध्यक्ष रवींद्रकुमार बिसेन, सचिव फत्तेसिंग सग्गू, सहसचिव सतीश पारधी, कोषाध्यक्ष आशिष बारेवार, कार्याध्यक्ष संजय बारेवार, सदस्य अंकित रहांगडाले, दीपक रहांगडाले, प्रमोद कटरे, ओमप्रकाश बिसेन, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख दिलीप चव्हाण उपस्थित होते. रेखलाल टेंभरे यांनी समितीच्या पुढील वाटचाली विषयी मार्गदर्शन केले. संचालन अंकित रहांगडाले यांनी केले तर आभार सतीश पारधी यांनी मानले.

Web Title: Sanitation campaign implemented in Moksha Dham ()