चुंबोली नदीवर पूल मंजूर

By Admin | Updated: March 20, 2017 00:54 IST2017-03-20T00:54:43+5:302017-03-20T00:54:43+5:30

स्वातंत्र्यापासून आजपर्यंत चुंबोली गावच्या आदिवासी जनतेला जे मिळाले नव्हते, ते या अंदाजपत्रकात मिळाले.

Sanction of the bridge on the river Kamoli | चुंबोली नदीवर पूल मंजूर

चुंबोली नदीवर पूल मंजूर

अंदाजपत्रकात तरतूद : आमदारांचे प्रयत्न सार्थकी
देवरी : स्वातंत्र्यापासून आजपर्यंत चुंबोली गावच्या आदिवासी जनतेला जे मिळाले नव्हते, ते या अंदाजपत्रकात मिळाले. ते म्हणजे तीन कोटी रूपये किमतीचे चुंबोली नदीवरील नवीन पूल. यासाठी आ. संजय पुराम यांचे प्रयत्न सार्थकी लागले.
देवरी तालुक्यातील पालांदूर-जमिदारी ते चुंबोली या गावावरील रस्त्यावर असलेल्या चुंबोली नदीवरील पूल उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे याच वर्षात कामाची सुरूवात होणार आहे.
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या चुंबोली गावातील पावसाळ्याचे चार महिने तालुक्याशी संपर्क तुटत असतो. त्यामुळे गावकऱ्यांंना बाजारपेठ, आरोग्य व शिक्षण यापासून वंचित राहण्याची पाळी येत असे. स्वातंत्र मिळाल्यापासून या गावात एकही आमदार व खासदार यांनी भेट दिली नव्हती.
आमदार झाल्यावर संजय पुराम यांंनी या गावाला भेट देऊन लोकांची रास्त समस्या लक्षात घेवून आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. रीतसर तांत्रिक प्रस्ताव तयार करून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला.
शनिवारी अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी आ. संजय पुराम यांनी चुंबोली पुलाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी फिल्डींग लावली होती. त्यामुळे ऐनवेळी या पुलाचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Sanction of the bridge on the river Kamoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.