भवभूती शिक्षण संस्थेला समाजभूषण पुरस्कार

By Admin | Updated: May 14, 2015 00:43 IST2015-05-14T00:43:51+5:302015-05-14T00:43:51+5:30

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाद्वारे सन २०१४-१५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण ...

Samaj Bhushan Award for Bhavabhuti Shikshan Sanstha | भवभूती शिक्षण संस्थेला समाजभूषण पुरस्कार

भवभूती शिक्षण संस्थेला समाजभूषण पुरस्कार

आमगाव : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाद्वारे सन २०१४-१५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मंत्रालयासमोर मुंबई येथे भवभूती शिक्षण संस्थेला देण्यात आला.
पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडाले, दिलीप कांबळे, स्नेहल आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ. बाबासाहेब समाज भुषण पुरस्कार सन २०१४-१५ साठी १० सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच ५१ व्यक्तिंना हा पुरस्कार व रोख देऊन सन्मानित करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील भवभूती शिक्षण संस्था आमगावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, राजकुमार बडोले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. २५ हजार रूपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेतर्फे केशवराव मानकर, सुरेश असाटी व डॉ.डी.के. संघी यांनी हा पुरस्कार स्विकारला.भवभूती शिक्षण संस्थेची स्थापना भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी खा. स्व. लक्ष्मणराव मानकर यांनी दुरदृष्टीकोन ठेऊन ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात १९५२ मध्ये केली. ग्रामीण भागातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी चोपा आणि कुऱ्हाडी येथे १९६० मध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर १९६४ मध्ये भवभूती महाविद्यालय सुरु केले. कला, वाणिज्य व विज्ञानाचे शिक्षण दिले जाते. सध्या तिथे पदव्यूत्तर पदवी व संशोधन विभागही सुरु आहे.भवभूती शिक्षण संस्थेंतर्गत मानकर ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट यामध्ये सर्वप्रथम १९८७ मध्ये तत्कालिन भंडारा जिल्ह्यामध्ये पहिले औषधी निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. त्यानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र केशवराव मानकर यांनी सुद्धा त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत शिक्षण सेवेचे व्रत अविरत सुरु ठेवले. या संस्थेने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. संस्थेने पुढे २००५ मध्ये बि.एड. २००६ मध्ये डीटीएड २००९ मध्ये पॉलिटेक्निक कॉलेज व २०१४ मध्ये आयटीआय अशा विविध अभ्यासक्रमाची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करुन दिली. या शैक्षणिक सुविधेचा फायदा आमगाव, गोंदिया क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता विदर्भासह मध्यप्रदेशातील विद्यार्थ्यांनाही होत आहे.विविध विद्याशाखांच्या माध्यमातून संस्थेने जी नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळेच या संस्थेचे नाव विदर्भातील अग्रगण्य संस्थेत गणल्या जाते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Samaj Bhushan Award for Bhavabhuti Shikshan Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.