अस्वच्छेतेसाठी एकमेकांवरच फोडले खापर

By Admin | Updated: November 15, 2014 01:46 IST2014-11-15T01:46:44+5:302014-11-15T01:46:44+5:30

महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र शासन सरसावले. ‘निर्मल व स्वच्छ भारत’ हे नाव देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

For the sake of unhappiness | अस्वच्छेतेसाठी एकमेकांवरच फोडले खापर

अस्वच्छेतेसाठी एकमेकांवरच फोडले खापर

गोंदिया : महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र शासन सरसावले. ‘निर्मल व स्वच्छ भारत’ हे नाव देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबरपासून या अभियानाला सुरुवात केली. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जोमाने सुरू असली तरी गोंदिया शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरले. नगर परिषदेच्या उदासीन कारभारामुळे शहराला आलेले हे गलिच्छ रूप कसे बदलता येईल, त्यासाठी कोण जबाबदार आहेत यावर ‘लोकमत’ने परिचर्चा घडवून आणली. त्यात सत्ताधारी व जुन्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर खापर फोडले. मात्र सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता राखण्याची ग्वाहीही दिली.
शहरातील नगर परिषदेवर आता भाजपची सत्ता आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्तात होती. त्यावेळीही हीच परिस्थिती होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही जबाबदारी असल्यामुळे त्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात स्वच्छता कुठेच दिसत नसून त्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप जुन्या पदाधिकाऱ्यांनी केला.
पदाधिकाऱ्यांची उदासीनता-पंकज यादव
गोंदिया शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष व पदाधिकारी उदासीन आहेत. खालच्या स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत भाजपची सत्ता असताना स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्या भाजपच्या लोकांनी गोंदिया शहराची दुरवस्था पहावी. आमच्या काळात २ ट्रॅक्टर असताना आम्ही गोंदिया शहर स्वच्छ ठेवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. आता स्वच्छतेसाठी ६-६ ट्रॅक्टर मागविण्यात आले आहेत. त्याचे भाडे महिन्याकाठी २ लाख रुपये मोजले जात असले तरी गोंदिया घाणीच्या साम्राज्यात आहे, ही वर्तमान नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: For the sake of unhappiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.