लोहिया विद्यालयात संत तुकाराम बीज व सेवानिवृत्ती सत्कार उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:25 IST2021-04-05T04:25:33+5:302021-04-05T04:25:33+5:30

अध्यक्षस्थानी संस्थापक जगदीश लोहिया होते. त्यांच्या हस्ते संस्थेतर्फे झोडे यांना भेटस्वरूप भगवान गणपतीची मूर्ती, शाल व श्रीफल देऊन ...

Saint Tukaram Seed and Retirement Reception at Lohia Vidyalaya | लोहिया विद्यालयात संत तुकाराम बीज व सेवानिवृत्ती सत्कार उत्साहात

लोहिया विद्यालयात संत तुकाराम बीज व सेवानिवृत्ती सत्कार उत्साहात

अध्यक्षस्थानी संस्थापक जगदीश लोहिया होते. त्यांच्या हस्ते संस्थेतर्फे झोडे यांना भेटस्वरूप भगवान गणपतीची मूर्ती, शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला, तसेच विद्यालयाकडून संस्थापक जगदीश लोहिया, सदस्य पंकज लोहिया, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, मुख्याध्यापक मनोज शिंदे, सदस्य राम झोडे यांच्या हस्ते भगवान राधाकृष्णाची मूर्ती, भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तर अनिल मेश्राम यांनी पुस्तक भेट स्वरूपात दिले. याप्रसंगी जगदीश लोहीया यांनी तुकाराम बीजनिमित्त तुकाराम महाराजांच्या जीवनावर विस्तृत माहिती दिली. संचालन सहायक शिक्षिका यू.बी.डोये यांनी केले. आभार सहायक शिक्षक डी.ए. दरवडे यांनी मानले. कार्यक्रमाला मधुसूदन दोनोडे, टी.बी.सातकर, डी.एस.टेंभुर्णे, आर.आर.मोहतुरे, शारीरिक शिक्षिका यु.आर.बाच्छल, जी.एस.कावळे, पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे, डॉ.संकेत परशुरामकर, संस्था सदस्य परेश लोहिया, थेर, अनिल दीक्षित, शमीम सय्यद, पठाण, प्रल्हाद कोरे, भजनदास बडोले, नलीराम चांदेवार, महादेव लाडे, कटनकर, प्रभू इटवले, दामोदर मेश्राम, पुरुषोत्तम लांजेवार, वसंता विठ्ठले, हरणे, तसेच संस्थेशी संबंधित सर्व समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, पाहुणे, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Saint Tukaram Seed and Retirement Reception at Lohia Vidyalaya