शिबिराचा पर्यटक, वन कर्मचारी व ग्रामस्थांनी घेतला लाभ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:15+5:302021-02-05T07:50:15+5:30
प्रजासत्ताकदिनी हजारोंच्या संख्येने पर्यटक हाजराफॉल येथे भेट देतात. त्यानुषंगाने पर्यटक, वन कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांना रोगनिदान शिबिराचा जास्तीत जास्त ...

शिबिराचा पर्यटक, वन कर्मचारी व ग्रामस्थांनी घेतला लाभ ()
प्रजासत्ताकदिनी हजारोंच्या संख्येने पर्यटक हाजराफॉल येथे भेट देतात. त्यानुषंगाने पर्यटक, वन कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांना रोगनिदान शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल, म्हणून या दिवशी रोगनिदान शिबिर ठेवण्यात आले होते. शिबिरात गोंदिया येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधने, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर, पॅथोलॉजिस्ट डॉ. संजय माहुले, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. स्वेतल माहुले, बालरोग तज्ज्ञ डॉ. राकेश चिखलोंडे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दिगंबर मरस्कोल्हे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नितिका पोयाम, ब्रेन व स्पाइन सर्जन डॉ. सनी जयस्वाल, शल्यचिकित्सक डॉ. सचिन केलनका, दंतरोग तज्ज्ञ डॉ. शंकर बनोटे, आयुर्वेदाचार्य डॉ. हेमंत गौतम, होमिओपॅथिक विशेषज्ञ डॉ. अजय बेलानी तसेच नॅशनल मेडिकल मोबाइल युनिट यांनी आपली सेवा दिली.
या शिबिराचा पर्यटक, वन कर्मचारी तसेच १४२ स्थानिक ग्रामस्थांनी लाभ घेतला. शिबिरात उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील तसेच शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले. आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल डॉक्टरांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. हिरवळ बहुउद्देशीय संस्थेचे रूपेश निंबार्ते व त्र्यंबक जरोदे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.