साई चाचा चौक गोविंदपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:27+5:302021-02-05T07:48:27+5:30
..... मंगलम मूकबधिर निवासी शाळा गोंदिया : उड्डान बहुउद्देशीय विकास संस्था भंडाराद्वारे संचालित मंगलम मूकबधिर निवासी शाळा गणेश लॉन ...

साई चाचा चौक गोविंदपूर
.....
मंगलम मूकबधिर निवासी शाळा
गोंदिया : उड्डान बहुउद्देशीय विकास संस्था भंडाराद्वारे संचालित मंगलम मूकबधिर निवासी शाळा गणेश लॉन फुलचूर नाका गोंदिया येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिलीप जैन, मदन जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शरद उईके, अशोक कलमुळे, आम्रपाली फुले, डिम्पल चौधरी, जगदिश मेश्राम उपिस्थत होते. संचालन डिम्पल चौधरी तर आभार मुख्याध्यापक रेशू चौकशे यांनी मानले.
.........
ॲक्युट पब्लिक स्कूल
गोंदिया: संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेतर्फे संचालित ॲक्युट पब्लिक स्कूल गोंदिया येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संस्थेच्या संचालक गीता भास्कर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगान करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत, लघुनाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम व भाषण आणि रांगोळी यातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संविधानाद्वारे मिळालेल्या मूलभूत अधिकाराबाबत सचिव संजय भास्कर यांनी माहिती दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहिलेल्या संविधानाविषयी माहिती सहसचिव शुभा शहारे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रियेश शहारे, शाळेचे प्राचार्य, पर्यवेक्षक प्रवीणकुमार मेश्राम, स्वाती डोये, अनिता नेवारे, रागिनी शाहू, खुशबू तुरकर, विद्या कोरे, कल्पना फाये, सबा शेख, दीपाली कोल्हे, श्रीकांत घोडेस्वार उपस्थित होते.