निवासस्थानांच्या दुर्दशेने पोलीस कर्मचारी त्रस्त
By Admin | Updated: August 28, 2014 23:52 IST2014-08-28T23:52:57+5:302014-08-28T23:52:57+5:30
तालुक्यातील डूग्गीपार पोलीसांच्या निवासस्थांची वाताहत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वात जुने पोलीस स्टेशन म्हणून डूग्गीपारची ओळख आहे. डूग्गीपार पोलीस कर्मचाऱ्यांना

निवासस्थानांच्या दुर्दशेने पोलीस कर्मचारी त्रस्त
सडक/अर्जुनी : तालुक्यातील डूग्गीपार पोलीसांच्या निवासस्थांची वाताहत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वात जुने पोलीस स्टेशन म्हणून डूग्गीपारची ओळख आहे. डूग्गीपार पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासाची व्यवस्था शासनाने केली आहे. मात्र सार्वजनीक बांधकाम विभागाच्या नियोजना अभावी सदर निवासस्थाने भूतबंगले होण्याच्या मार्गावर आहे.
मागील २६ वर्षापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ९ निवासस्थाने तयार करण्यात आली. यानंतर काही वर्षांनंतर दोन मजली सिमेंट कॉकेंटच्या दहा निवासास्थाने लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आली. त ेही निवासस्थाने फारच कमी जागेत तयार करण्यात आले आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आई-वडील राहण्यासाठी आल्यास मोठी अडचण होते. जून्या व नवीन निवासस्थानाची वाताहत झाल्यामुळे त्या ठिकाणी एकही कर्मचारी राहत नाही. आता संपूर्ण निवासस्थाने कुत्र्यांचे व जनावरांचे आश्रयस्थआन झाले आहे. त्या ठिकाणी पाणी विजेची पूरेशी सोय नसल्यामुळे तिथे कोणीच राहात नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभ तयार करण्यात आले. मात्र मोटारपंप नसल्यामुळे त्या मोटार पंपाव्दारे पाणी जलकुंभात चढत नाही.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत होते. निवासस्थानाला लागून गवताचे मोठे-मोठे झुडूप वाढले आहे. निवासस्थानाकडे जाण्याकरीता डांबरीकरण नसल्यामुळे त्यांनाही चिखलातूनच जावे लागत होते. गेल्या २६ वर्षापूर्वी बांधकाम आलेल्या निवासस्थानांना काही ठिकाणी भगदळ पडली आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेक वस्तु चोरीला जाण्याची शक्यता आहे.
सध्या डूग्गीपार पोलीस स्टेशनचे कर्मचारी कोहमारा, सडक/अर्जुनी, डूग्गीपार येथे भा्याने राहतात. लोकप्रतिधी व जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)