बलिदान देणाऱ्यांचा विसर
By Admin | Updated: August 29, 2015 01:52 IST2015-08-29T01:52:28+5:302015-08-29T01:52:28+5:30
भारताच्या स्वातंत्र्यासाठी उठलेली ठिणगी १८५७ पासून विक्राळ रूप घेत गेली. ९० वर्षे संघर्ष केल्यानंतर भारत स्वतंत्र झाला.

बलिदान देणाऱ्यांचा विसर
बबनराव वानखेडे : क्रांतिज्योत यात्रेत पद्मपूर येथे मार्गदर्शन
आमगाव : भारताच्या स्वातंत्र्यासाठी उठलेली ठिणगी १८५७ पासून विक्राळ रूप घेत गेली. ९० वर्षे संघर्ष केल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. या ९० वर्षांच्या काळात लाखो लोकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आम्ही विसरलो आहोत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची आठवण करून देण्यासाठी गुरूदेव सेवा मंडळातर्फे क्रांतिज्योत यात्रा सुरू करण्यात आली, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख बबनराव वानखेडे यांनी केले.
गुरूकुंज आश्रमातर्फे आयोजित क्रांतिज्योत यात्रेप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात फार मोठी कामगिरी केली. चिमूर, आष्टी, यावली व बेनोरा येथे १६ आॅगस्ट १९४२ रोजी संघर्ष पेटविला. परंतु राष्ट्रसंताचे नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत टाकण्यात आले नाही. शासनाने त्वरित राष्ट्रसंताचे नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत घालावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याचे गुरूदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी भागवत निस्ताने, सांगलीचे दिलीप गायकवाड, अभियंता डॉ. रघुनाथ साबळे, एकनाथ गोहत्रे, तपाडे गुरूजी, दिलीप कठाळे, अमर वानखेडे, राहुल खेडकर, मुख्याध्यापक शरद उपलवार, सरपंच सीता पाथोडे, उपसरपंच पुरूषोत्तम किरणापुरे, अशोक चुटे, पुनाराम भांडारकर, शंकर वारंगे, ज्ञानिराम ठाकरे, यशोदा रहिले, गंगा हुकरे, कमला हुकरे, गीता शेंडे, डॉ. भरतलाल हुकरे, हभप एम.ए. ठाकूर उपस्थित होते.
या वेळी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमासाठी आडकू वंजारी, नरेश रहिले, जगदीश चुटे, ललीत भांडारकर, निर्मला बहेकार, हिरण तावाडे, लक्ष्मी हुकरे, लक्ष्मी मेंढे, पार्वता डोये, भागरथा भांडारकर, सरस्वता भांडारकर, अनुसया कोरे, देवला बहेकार, सीता वारंगे, दमयंती भंडारी, फागुलाल डुंबरकांबळे, वीणा डोये, सीताराम भांडारकर आदी भाविकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)