पावसाची दमदार एंट्री

By Admin | Updated: July 23, 2016 02:23 IST2016-07-23T02:23:17+5:302016-07-23T02:23:17+5:30

मागील काही दिवसांपासून नाराज असलेल्या वरूणदेवाने पुन्हा अपली दमदार एंट्री लावली असून

Rusty entry of rain | पावसाची दमदार एंट्री

पावसाची दमदार एंट्री

देवरी तालुक्यात अतिवृष्टी : १४६१७.१ मीमी. पावसाची नोंद
गोंदिया : मागील काही दिवसांपासून नाराज असलेल्या वरूणदेवाने पुन्हा अपली दमदार एंट्री लावली असून गुरूवारपासून जिल्ह्यात चांगला पाऊस बरसत आहे. मात्र आहे या पावसापेक्षा अधिक पाण्याची गरज असल्याने शेतकरी आताही आकाशाकडे बघत आहेत. जिल्ह्यात अतापर्यंत १४६१७.१ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी ४४२.९ मीमी. आहे. तर देवरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.
मध्यंतरी दमदार पावसामुळे जिल्हा जलमय झाला होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यात पुर स्थिती निर्माण होण्याचे चित्र दिसून येत होते. एकंदर दमदार पावसामुळे सर्वच खुश होते व शेतीच्या कामांना वेग आला होता. मात्र मागील आठ-दहा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याचे दिसू लागले. दिवसाभरात एखादी रिपरिप एवढाच पाऊस बरसत होता.
अचानक वरूणराज नाराज झाल्याने शेतीची कामे बंद पडली आहेत. शिवाय वातावरणात उकाडा वाढू लागला व उन्हाळा परतून आला असे वाटू लागले होते. उकाड्यामुळे पुन्हा कुलर वापरणे सुरू करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गुरूवारपासून (दि.२१) पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केली.
जिल्ह्यात आतापर्यंत १४६१७.१ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी ४४२.९ मीमी. एवढी आहे. तर शुक्रवारी (दि.२२) सकाळपर्यंत जिल्ह्यात ५७३.६ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी १७.३ मीमी. एवढी आहे.
यात गोंदिया तालुक्यात ५८ मीमी., गोरेगाव २८.१ मीमी., तिरोडा २१.३ मीमी., अर्जुनी-मोरगाव १६४ मीमी., देवरी ८१ मीमी., आमगाव ५८ मीमी., सालेकसा ६२.४ मीमी. तर सडक-अर्जुनी तालुक्यात १००.८ मीमी. अशी ५७३.६ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी १७.३ मीमी. आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rusty entry of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.