सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी

By Admin | Updated: March 27, 2015 00:39 IST2015-03-27T00:39:08+5:302015-03-27T00:39:08+5:30

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे.

Rs.20 lacs for Sihorakarak | सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी

सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी

चुल्हाड (सिहोरा) : तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे. थकबाकीचा आकडा फुगत असल्याने गावातील विकास कामे प्रभावित होत आहेत. यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सिहोरा गावात शासकीय अनुदान तथा योजनांचा निधी गावाच्या विकासाला तारणहार ठरला आहे. यामुळे गावात अनेक सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले आहे. परंतु या पलिकडे अन्य विकास कामे प्रभावित झाली आहेत. गावात नाविण्यपूर्ण विकास कामांना थकबाकीची अडचण समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या गावात घरकरांचे नागरिकांवर १३ लाख ७५ हजार ५७५ रुपयांची थकबाकी असून डोकेदुखी ठरणारी आहे. एकूण १८ लाख ७६ हजार ९२५ रुपयाची थकबाकी असताना फक्त ५ लाख ६५ हजार ५६५ रुपयाची वसुली झाली आहे. या थकबाकीत बडे आसामी असल्याची माहिती मिळाली आहे. थकीत कराची वसूली करताना जप्तीची कारवाई होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढता आहे. सार्वजनिक दिवाबत्तीचे ४२ हजार ८१५ रुपये थकीत असल्याने ही दिवाबत्ती अडचणीत आली आहे. गावागावात थकीत कर विज बिलांचे देयक धारकांवर कनेक्शन कपातीचा दांडा महावितरण उगारला आहे. हीच भीती सार्वजनिक दिवाबत्तीला आडकाठी ठरणार आहे.
या गावात उपकराची थकबाकी नाकी नऊ आणणारी आहे. ४३ हजार १०५ रुपयाची थकबाकी थक्क करणारी आहे. तर धंदा कर ५४९ रुपयाची थकबाकी आहे. धंदाकरांच्या वसुलीत प्रामाणिकपणा दिसून येत आहे. परंतु जीवन असणाऱ्या पाणी संदर्भात मोठी कंजुशी कर वसुलीत दिसून येत आहे. या गावात पाणी पुरवठा योजनेत सामान्य आणि खास अशी विभागणी करण्यात आली आहे. सामान्य पाणीपट्टी कराची वसुली झाली आहे. यात १ लाख २८ हजार ५४५ रुपयाची थकबाकी दिव्याखाली अंधार असा संदेश देत आहे.खास पाणी पुरवठा नळ योजनेची वसुली १ लाख २४ हजार ४४० रुपये झाली आहे. ३ लाख ५१० रुपयाची थकबाकी चिंता वाढविणारी आहे. वाढत्या थकबाकीने शुद्ध पाणीच दुषित होण्याची चिन्हे आहेत. पोाणी पट्टी आणि नळ योजनेची एकुण थकबाकी ४ लाख २९ हजार ५५ रुपये आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही थकबाकीची वसुली महत्वपूर्ण ठरणारी आहे. गावात विविध कराची एकूण थकबाकी १८ लाख २६ हजार ८८४ रुपये आहे. ही थकबाकीची वसुली गावाच्या विकासात रामबाण ठरणार आहे. परंतु थकबाकी आजवर शुन्यावर आली नाही .गावाच्या विकासात गावकऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. वाढती थकबाकी तथा टक्केवारी पूर्ण करण्यात येत नसल्याने शासन अनुदान वाटपात कात्री लावत आहे. अशा गावांना अनुदान राशी वाटपात ठेंगा दाखवत आहे. यामुळे गावात विकास कामे प्रभावित ठरत आहेत.
याउलट गावात विकास कामे होत नसताना ग्रामपंचायतीला धारेवर धरण्यात येत आहे. अन्य गावातही हीच अवस्था आहे. गावाच्या विकासात गावकऱ्यांची सहकार्याची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Rs.20 lacs for Sihorakarak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.