३५५३ वाहनधारकांकडून वसूल केला पाच लाख रुपयांचा दंड

By Admin | Updated: November 18, 2015 01:50 IST2015-11-18T01:50:57+5:302015-11-18T01:50:57+5:30

दिवाळीच्या धामधुमीत वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक, बेशिस्त पार्र्किंग यासह ...

Rs. 5 lakh fine collected from 3553 drivers | ३५५३ वाहनधारकांकडून वसूल केला पाच लाख रुपयांचा दंड

३५५३ वाहनधारकांकडून वसूल केला पाच लाख रुपयांचा दंड

दीड महिन्यातील कारवाई : वाहतूक नियमांची पायमल्ली
गोंदिया : दिवाळीच्या धामधुमीत वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक, बेशिस्त पार्र्किंग यासह विविध वाहतूक नियमांचे धिंडवडे काढणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. दिवाळीच्या एक महिना आधीपासून सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत पाच लाखांच्या घरात दंड वसूल करण्यात आला.
दिवाळीच्या एक महिना अगोदरपासून जिल्हाभरात वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्याचे धाडसत्र वाहतूक नियंत्रक पोलिसांकडून राबविण्यात आले. गोंदिया जिल्हा वाहतुक पोलिसांनी आॅक्टोबर महिन्यात अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या २१५ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार ६०० रूपये दंड वसूल केला आहे.
या अवैध वाहतुकीत एक कार असून त्याच्याकडून २ हजार रूपये दंड वसूल केला आहे. १३ जीप चालकांकडून २५ हजार ४०० रूपये, ३ मेटॅडोर चालकांकडून ४ हजार रूपये, ६ ट्रॅक्टर चालकांकडून ६ हजार रूपये, १० ट्रॅव्हल्स चालकांकडून २१ हजार रूपये, ६५ टॅक्सी चालकांकडून ६५ हजार २०० रूपये, ११७ आॅटोरिक्षाकडून ३९ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३१४१ इतर वाहन चालकांकडून ३ लाख २१ हजार १०० रूपये वसूल करण्यात आले.
आॅक्टोबर महिन्यात एकूण ३३५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून चार लाख ७४ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या १५ दिवसात गोंदियाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने १९७ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १९ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या पंधरवड्यात जिल्ह्यात वाहनांवर झालेल्या कारवाईची माहिती महिनाअखेर मिळणार असल्याने दिवाळीच्या सणातील पंधरवड्यात झालेली कारवाई आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत मोठी असल्याची चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत दिड महिन्याच्या आत पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वाहन चालकांना सिग्नलचे भान नाही
शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी गोंदिया शहराच्या चौका-चौकात बसविण्यात आलेले सिग्नल पाहूनच वाहन चालकांनी आपले वाहन चालविणे आवश्यक आहे. परंतु अनेक वाहन चालक हे सिग्नल तोडून वाहने नेतात. त्यामुळे एकाच्या बरोबर इतरही वाहन चालक तोच प्रकार करतात. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत असतो. मात्र जलद वाहने हाकणाऱ्या त्या व्यक्कीला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे संतुलन ढासळेल व अपघात होईल म्हणून त्याचा पाठलाग केला जात नाही.

Web Title: Rs. 5 lakh fine collected from 3553 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.