सभापतीच्या कक्षाचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:42 IST2017-08-30T21:42:05+5:302017-08-30T21:42:23+5:30

नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सभापती दिलीप गोपलानी यांच्या नगर परिषदेतील कक्षाचे छत अचानक कोसळले. त्यावेळी त्यांच्या कॅबिनमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी घटना टळली.

 The roof of the chairmanship collapsed | सभापतीच्या कक्षाचे छत कोसळले

सभापतीच्या कक्षाचे छत कोसळले

ठळक मुद्दे नगर परिषदेतील कक्षाचे छत अचानक कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सभापती दिलीप गोपलानी यांच्या नगर परिषदेतील कक्षाचे छत अचानक कोसळले. त्यावेळी त्यांच्या कॅबिनमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी घटना टळली. यामुळे नगर परिषदेच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
मंगळवारी (दि.२९) दुपारी अचानक सभापती गोपलानी यांच्या कक्षाचे छत एका ठिकाणातून कोसळले. घटनेची माहिती मिळताच न.प.चे प्रशासकीय अधिकारी राणे व इतर कर्मचारी पाहण्यासाठी तेथे पोहोचले. दरम्यान दुसºया ठिकाणावरूनही छत कोसळले. त्यामुळे तेथे पाहण्यासाठी गेलेल्या सर्व कर्मचाºयांनी तेथून पळ काढला. तत्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. विशेष म्हणजे तीन चार महिन्यांपूर्वीच त्या ठिकाणी सभापती यांच्यासाठी कक्ष तयार करण्यात आले होते. कक्षात नवीन फर्निचर लावण्यात आले होते. यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. पूर्वी या कक्षाच्या ठिकाणी लेखा विभागाचे कार्यालय होते. परंतु पावसामुळे लेखा विभागाचे दस्तावेज खराब होवू नये, यासाठी सदर कार्यालय जवळपास दोनतीन वर्षांपूर्वीच हटविण्यात आले होते. ही बाब माहीत असतानासुद्धा सभापती यांचे कक्ष त्या ठिकाणी का तयार करण्यात आले? यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ज्या ठिकाणी हे कक्ष आहे ते नगर परिषद कार्यालयाच्या मुख्य भवनाच्या वरील माळ्यावर एका कोपºयात आहे. त्याच्यावरील मजल्यावर मुख्याधिकारी व नगर परिषदेचे अध्यक्ष यांचेसुद्धा कक्ष आहे. परंतु ते पूर्णत: सुरक्षित आहे. पाणी पुरवठा सभापती यांच्या कक्षाजवळ दोन खोल्यांमध्येसुद्धा पाऊस पडताच पाणी साचते. पावसाळ्याचे पाणी बाहेर काढण्याची कसलीही व्यवस्था या भवनात करण्यात आली नाही. यामुळे येथे कधी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाणी वाहून जाण्यासाठी कसलीही योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात छताला ओलावा येतो. अनेक वर्षांपासून हिच स्थिती आहे. नगर परिषदेची नवीन इमारत बनविण्यासाठी आतापर्यंत कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. यावर अधिक बोलता येणार नाही.
-सी.ए. राणे
प्रशासकीय अधिकारी,
न.प. गोंदिया

Web Title:  The roof of the chairmanship collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.