शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

खासगी शाळांकडून सक्तीच्या नावावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 9:12 PM

आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडून घेतला जात आहे.

ठळक मुद्देअतिरिक्त शुल्काची आकारणी : शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका, पालकांची गळचेपी

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडून घेतला जात आहे. शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके शाळेतूनच घेण्याची सक्ती व त्यावर अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची त्यांच्याच डोळ्यादेखत लूट सुरू आहे. मात्र आपल्या पाल्याचे नुकसान होवू नये, म्हणून पालक हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत आहे.जिल्हा परिषद व इतर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेरुन पुस्तके खरेदी करावी लागतात. सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम देखील वेगवेगळा आहे. या अभ्यासक्रमांची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहे. पण, खासगी इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी कमिश्नखोरीकरिता शाळेतच पाठपुस्तके व इतर साहित्याचे दुकाने लावून तिथूनच पाठपुस्तकांची खरेदी करण्याची सक्ती केली आहे. शाळांमधून पुस्तके घेतली नाही तर पालकांना धमकाविण्याचे प्रकार सुध्दा काही शाळांमध्ये सध्या सुरु आहेत. त्यामुळे पालक सुध्दा आपला पाल्य नामाकिंत शाळेतील प्रवेशापासून वंचित राहू नये, त्याला वर्षभर शाळा व्यवस्थापनाकडून त्रास व्हायला नको, म्हणून पालक देखील हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत आहे. मात्र दरवर्षी खासगी शाळांमध्ये पाठपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीच्या नावावर अक्षरक्ष: लूट केली जात आहे. ज्या पाठ्यपुस्तकांचे दर बाजारपेठेत कमी आहे. तीच पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना अतिरिक्त दर आकारुन विक्री केली जात आहे. एखाद्या पालकांने यावर ओरड केल्यास त्यांना परवडत नसेल तर शाळेत प्रवेश घेवू नका, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे पालकांचा सुध्दा नाईलाज आहे. मागील वर्षी शैक्षणिक सत्रादरम्यान खासगी शाळांनी पाठपुस्तकांच्या नावावर सुरू केलेल्या लूटमारी विरोधात पालकांनी आवाज उठविल्यानंतर न्यायालयाने दखल घेत शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी सक्ती न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही खासगी शाळांमधून दुकानदारी बंद करुन विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास सांगितले जात आहे. सक्तीच्या नावावर कमिश्नखोरी व पालकांची लूट मात्र कायम आहे.शाळांची चलाखीशहरातील एका नामाकिंत खासगी शाळेत सध्या सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अभ्यासक्रमाची पुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली आहे. सीबीेएसई इयत्ता पाचवी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या संचाचे शुल्क ३ हजार ९९८ रुपये आकारले जात आहे. मात्र या संचाची बाजारपेठेत किंमत केवळ ३ हजार रुपये आहे. शाळेने पुस्तकावर प्रिंट केलेल्या किंमतीच्या बाजुला स्टॉम्प मारून त्यावर ८० ते ९० रुपये अतिरिक्त आकारुन स्टॅम्प मारुन एक प्रकारे लूट सुरू केल्याचे चित्र आहे.शाळेतूनच खरेदीची सक्ती का?सीबीएसईसह इतर अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहे. त्यांचे दर देखील शाळांमधून मिळणाऱ्या पुस्तकांपेक्षा कमी आहे. मात्र खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतानाच शाळेतून पाठ्यपुस्तके, गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागेल, अशी सक्ती केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना नाईलाजास्तव अतिरिक्त पैसे मोजून शाळेतूनच पुस्तके खरेदी करावी लागत आहे.दरवर्षी नवीन गणवेश व बुटांची सक्तीपाठपुस्तकांच्या सक्तीसह दरवर्षी गणवेशात शाळांकडून बदल केला जात आहे. तसेच कॉन्व्हेंटपासून इयत्ता आठव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळे गणवेश आणि दरवर्षी नवीन बुट घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे पालकांना दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.पालकांचे बजेट बिघडलेखासगी शाळांच्या प्रवेश शुल्कात व पाठपुस्तकांच्या दरात दरवर्षी वाढ केलीे जात आहे. केजी वन किंवा केजी टू मध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी २० ते २५ हजार रुपये शुल्क आणि पाठपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे ८ ते १० हजार रुपये लागत असल्याने पालकांचे बजेट पूर्णपणे बिघडले असून दिवसेंदिवस खासगी शाळांमध्ये पाल्यांना शिकविणे कठीण झाले आहे.लाखो रुपयांची उलाढालखासगी शाळांमध्ये पाठपुस्तके शाळांमधून खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. गोंदिया शहरात ४० वर खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून यामध्ये २० हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. एका विद्यार्थ्याच्या पाठपुस्तकांच्या संचामागे काही शाळा हजार रुपयांच्यावर शुल्क आकारात आहे. तर काही शाळांनी विशिष्ट दुकाने निश्चित करुन स्वत:चे कमिश्न ठरविले आहे. यातून शाळा व्यवस्थापन लाखो रुपयांचे कमिश्न लाटत असल्याचे चित्र आहे.शिक्षण विभागाची बघ्याची भूमिकाखासगी शाळांकडून पाठपुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करुन पालकांची लूट केली जात आहे. याबाबत पालकांची ओरड सुध्दा सुरू आहे. मात्र अद्यापही शिक्षण विभागाने याची साधी चौकशी करुन एकाही शाळेवर कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाºयांप्रती पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. तर काही पालकांनी जिल्हाधिकाºयांनी खासगी शाळांना भेट देवून कारवाईची करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा