सिव्हिल लाइन्स परिसरातील रस्ते उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:47+5:302021-02-05T07:48:47+5:30
मार्किंगनंतरही वाहने रस्त्यावरच गोंदिया : विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी व बाजारात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी वाहतूक ...

सिव्हिल लाइन्स परिसरातील रस्ते उखडले
मार्किंगनंतरही वाहने रस्त्यावरच
गोंदिया : विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी व बाजारात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून मार्किंग केली आहे. मात्र त्यानंतरही रस्त्यावर वाहने उभी केली जात असताना दिसत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने लक्ष देत आता अशा वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे.
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करा
गोंदिया : कोरोनाचा जोर कमी होत असल्याने बघून आता नागरिकांकडून मास्क लावण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे, कित्येक बेजबाबदार नागरिक रस्त्याने ये-जा करताना थुंकतात. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांवर त्यांच्या थुंकीचे तुषार उडत असून हा प्रकार धोकादायक आहे. यामुळे अशांना चांगलाच दणका देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
दुकानातला कचरा येतो रस्त्यावर
गोंदिया : दुकानातील कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर मध्यंतरी नगर परिषदेने कारवाई केली होती. मात्र आता कारवाई बंद असल्याने व्यापारी दुकानातील कचरा पुन्हा रस्त्यावर टाकत असल्याचे दिसत आहे. अशात कित्येकदा रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धूळ व कचरा उडतो. नगर परिषदेने आता पुन्हा यासाठी मोहीम सुरू करण्याची शहरवासीयांची मागणी आहे.