रानडुकराच्या शिकार प्रकरणात चौघांना अटक सडक/अर्जुनी : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक/अर्जुनी अंतर्गत सौंदड सहायक
By Admin | Updated: September 21, 2014 23:54 IST2014-09-21T23:54:23+5:302014-09-21T23:54:23+5:30
वनक्षेत्रातील कंम्पार्टमेंट नं. २०० मध्ये रानडुकराचे शिकार करणाऱ्या चार आरोपींना पकडण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी २ वाजता फुटाळा येथे करण्यात आली. रानडुकराचे मास विक्री प्रकरणाची

रानडुकराच्या शिकार प्रकरणात चौघांना अटक सडक/अर्जुनी : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक/अर्जुनी अंतर्गत सौंदड सहायक
वनक्षेत्रातील कंम्पार्टमेंट नं. २०० मध्ये रानडुकराचे शिकार करणाऱ्या चार आरोपींना पकडण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी २ वाजता फुटाळा येथे करण्यात आली. रानडुकराचे मास विक्री प्रकरणाची भनक नव्याने रूजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांना लागली. त्यांनी आपल्या वनकर्मचाऱ्यांसोबत सापडा रचून फुटाळा येथील अन्ना ठाकरे, उमेश गोबाडे, दयारा सोनवाने, विलास सोनवाने या चौघांना रंगेहात पकडले. या चार आरोपी व्यतीरिक्त पाचवा आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या चार आरोपींना न्यायालयापुढे उभे करून जमानतीवर सोडण्यात आले. आरोपींना पकडण्यासाठी सौंदडचे वनक्षेत्र सहायक विलास बेलखोडे, कोहमाराचे वनक्षेत्र सहायक डी.जी. चव्हाण, वनरक्षक शामराव शेंडे, रमेश काळबांदे, शिवा तांडेकर, विनायकराव नागरीकर, सुरेश मेंढे, दुर्योधन शेंडे आदी वनमजुरांनी सहकार्य केले. सडक/अर्जुनी तालुक्यात कोणतीही वन्यप्राणी व अवैध वृक्ष तोडीची माहिती मिळाल्यास त्या आरोपींची गय केली जाणार नाही, अस वनपरिक्षेत्र सहायक राठोड म्हणाले. मागील काळात झालेली हेटी, गिरोला, जांभडी, देवपायली, दल्ली, पांढरी व रेेंगेपार या परिसरातील झालेल्या अवैध प्रकरणाची चौकशी करून दोषींवर करवाई करणार असल्याची ग्वाही राठोड यांनी दिली. जंगल परिसराचा फायदा घेत वन्यप्राण्याची शिकार करणारे लोक सक्रिय झाले आहेत. जीवंत विद्युत तारेच्या साह्याने वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याने या शिकारी टोळीचा शोध घेण्यासाठी वनकर्मचारी गस्त घालत आहेत.(शहर प्रतिनिधी)