युवा वर्गासाठी ‘रोडमॅप करिअरचा, पासवर्ड यशाचा’
By Admin | Updated: November 3, 2014 23:28 IST2014-11-03T23:28:22+5:302014-11-03T23:28:22+5:30
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र सूट, सवलत, अनुदान व शिष्यवृत्ती आदी योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहितीच मिळत नाही. केवळ माहितीअभावी कुणाची

युवा वर्गासाठी ‘रोडमॅप करिअरचा, पासवर्ड यशाचा’
गोंदिया : गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र सूट, सवलत, अनुदान व शिष्यवृत्ती आदी योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहितीच मिळत नाही. केवळ माहितीअभावी कुणाची संधी हुकली किंवा हिरावली जावू नये म्हणून ‘रोडमॅप करिअरचा... पासवर्ड यशाचा’ या नावाची माहिती पुस्तिका लोकमत युवा नेक्स्टच्या वतीने प्रकाशित करण्यात आली. सदर पुस्तिकेचे प्रकाशन सोमवारी (दि.३) दुपारी ३ वाजता लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे मान्यवरांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, राधाबाई नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक विजय बाहेकर, सुवर्ण व्यापारी गगन अग्रवाल, आकृती अॅडव्हर्टाईजमेंटचे संचालक प्रमोद गुडधे, नाट्य कलावंत प्रा.देवा बोरकर, लोकमतचे कार्यालय प्रमुख प्रशांत मिश्रा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, देवानंद शहारे, संतोष शर्मा, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत उपस्थित होते.
स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना आहेत. पण त्याची माहितीच मिळत नाही. त्यामुळे उपलब्ध संधींचा लाभ घेता येत नाही. असे होवू नये म्हणून लोकमत युवा नेक्स्टने एक पाऊल पुढे टाकले आहे. या पुस्तिकेत पब्लिक रिलेशन, गेम डिझायनर, निसर्ग संगोपणात करिअर, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इको आर्ट्सचे गोळे, आॅन हेअर, आॅटोमोबॉईल डिझायनिंग, गेम डिझायनर, मरीन इंजिनिअरिंग, ब्युटी पार्लर्स, युपीएससी, एमपीएसी आदींची माहिती या पुस्तिकेत आहे.
महाविद्यालयात शिकणाऱ्या तरूण-तरूणींनी संग्रही ठेवण्यासारखी आणि उपयुक्त अशी ही पुस्तिका आहे. सदर पुस्तिका हवी असेल तर ती सहजच मिळू शकेल. त्यासाठी लोकमत युवा नेक्स्टचे सदस्य असणे आवश्यक आहे. लोकमत युवा नेक्स्टची सदस्यता नोंदणी सुरू असून युवा वर्गाने आपली नोंदणी करून घ्यावी.
या पुस्तिका प्रकाशनप्रसंगी लोकमत कार्यालयातील राजीव फुंडे, पंकज गहेरवार, राजेश नक्षिणे, संगीता बन्सोडे, संतोष बिलोने आदी उपस्थिथ होते. सदस्यता नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया (०७१८२-२३०५०७, ९८८१०११८२१) येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)