रस्ता सुरक्षा अभियानाचे विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित

By Admin | Updated: February 1, 2015 22:59 IST2015-02-01T22:59:27+5:302015-02-01T22:59:27+5:30

वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१५ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना

Road Security Mission distributed students to the students | रस्ता सुरक्षा अभियानाचे विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित

रस्ता सुरक्षा अभियानाचे विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित

गोंदिया : वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१५ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. सदर कार्यक्रम वाहत्ूुक शाखा कार्यालय मनोहर चौक, गोंदिया येथे घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, प्राचार्य अंजन नायडू, प्राचार्य एन.के. बाहेकार, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ना.रा. निमजे, शहर ठाणेदार पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, रामनगरचे पोलीस निरीक्षक कबाडी, गोंदिया ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनवने, रावणवाडीचे पोलीस निरीक्षक निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात सहकार्य करणारे लॉयन्स क्लब गोंदिया, जेसीआय गोंदिया तसेच राईस सिटीचे अध्यक्ष व सभासदांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला विविध शाळा, महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस, आरएसपी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकगण, शहरातील मान्यवर, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, आॅटो व काळी-पिवळी संघटना, ट्रान्सपोर्ट संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल शहरातील जे.एम. हायस्कूल, गुरूनानक स्कूल, एस.एस. गर्ल्स कॉलेज, सरस्वती महिला विद्यालय, एन.एम.डी. कॉलेज, नुतन हायस्कूल यांना विशेष ट्रॉफी देवून गौरव करण्यात आले. त्यानंतर वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विविध शाळांतंर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धामधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात आठवी ते दहावीच्या गटामध्ये प्रथम गुरूनानक विद्यालयाचा रितेश डी. शेंडे, व्दितीय गुरूनानक हिंदी हायस्कूलचा आदित्य आशिष बागडे तर तृतीय पुरस्कार मनोहर म्युनिसिपल हायस्कूलचा विद्यार्थी मयूर सिंगणधुपे याला मिळाला.
वर्ग पाचवी ते सातवीच्या गटातील चित्रकला स्पर्धेत प्रथम गुरूनानक वरिष्ठ प्राथमिक शाळेचे यश तिवारी, व्दितीय हर्शद हिरामण मंडीये व तृतीय क्रमांक गुरूनानक इंग्रजी शाळेचा विद्यार्थी अमन रामटेके याला मिळाला. तसेच उप परिवहन कार्यालयातर्फे संपूर्ण जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्राथमिक गटात देवरीच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचा मोहित वामनराव मानकर प्रथम, जि.प. उत्तर बुनियादी शाळा तिरोडाची विद्यार्थिनी ग्रेसी सुरेश डोंगरे द्वितीय तर याच बुनियादी शाळेची श्रुती बाळू पाटील या विद्यार्थिनीने तृतीय पुरस्कार मिळविला.
माध्यमिक गटाच्या चित्रकला स्पर्धेत डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूलमधील वर्ग आठवीचा मोहित मदन कापसे प्रथम, देवरी येथील छत्रपती हायस्कूलच्या वर्ग आठवीचा मोहित मुनेश्वर शहारे द्वितीय तर मक्काटोला (सालेकसा) येथील पंचशील हायस्कूलमधील वर्ग नववीची विद्यार्थिनी प्रगती देवराज भांडारकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. सर्वांना बक्षिसे देण्यात आली.
प्रास्ताविक प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ना.रा. निमजे यांनी करून रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत राबविलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर आभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Road Security Mission distributed students to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.