मुख्य मार्गावर प्रवाशांची कोंडी
By Admin | Updated: March 20, 2017 01:02 IST2017-03-20T01:02:38+5:302017-03-20T01:02:38+5:30
येथील आठवडी बाजार मुख्य मार्गावर भरतो. मात्र या मार्गावर अतिक्रमण वाढल्याने रस्त्यावरून चालताना प्रवाशांची कोंडी होत असून नेहमीच अपघाताची शक्यता असते.

मुख्य मार्गावर प्रवाशांची कोंडी
सौंदड आठवडी बाजार : अतिक्रमण हटविण्याची मागणी
सौंदड : येथील आठवडी बाजार मुख्य मार्गावर भरतो. मात्र या मार्गावर अतिक्रमण वाढल्याने रस्त्यावरून चालताना प्रवाशांची कोंडी होत असून नेहमीच अपघाताची शक्यता असते.
सौंदड हे गाव तालुक्यात सर्वात मोठे गाव असून जवळपास बावीस गावांचे केंद्रबिंदू आहे. येथील आठवडी बाजार दर बुधवारी लागतो. अनेक मोठ्या व्यापाऱ्यांसह शेतकरीसुद्धा आपला माल थेट या बाजारामध्ये विक्रीकरिता आणतात. त्यामध्ये मोठे व्यापारी नव्हे तर छोटे शेतकरी सुद्धा या बाजारामध्ये टोपल्या घेवून बसतात. मात्र अवैधरित्या मुख्य मार्गावर अतिक्रमण तर वाढतच आहे. परंतु या बाजारामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांची कंत्राटदारांमार्फत अवैधरित्या लूट होत आहे. संबंधित कंत्राटदाराने सौंदड बाजारामध्ये भरपूर जागा असूनही बाजार वाढीच्या ठिकाणातील जागेची स्वच्छता करुन दुकानदारांना दुकान लावण्याकरिता मुबलक जागा उपलब्ध करुन द्यावी. या बाजाराच्या ठिकाणी गावकऱ्यांच्या मार्फत अतिक्रमण होत आहे. या ठिकाणावर तणसीचे ढिग, जळावू लाकडे यासारखे साहित्य ठेवून संबंधित जागेचा दुरूपयोग केला जात आहे. तर दुसरीकडे बाजारातील ग्राहकांकडून कुठल्या प्रकारची पावती न देता बळजबरीने छोट्या मोठ्या शेतकऱ्यांकडून अवैधरित्या वसुली केली जात आहे.
मात्र संबंधित विभाग निंद्रावस्थेत असल्याचे व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे.
रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत तसेच कंत्राटदारांना या समस्येची जाणीव करुन दिल्यावरही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या सांगावे कुणाला, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देवून अतिक्रमण व वाहन धारकांपासून मुक्तता द्यावी व मुख्य मार्गावरील चालणारे विद्यार्थी, शेतकरी, दुचाकी, चारचाकी व जनावरांना रस्ता मोकळा करून देण्यात यावा. तसेच या मार्गाने चालणाऱ्यांची कोंडी होण्यापासून थांबवावे, अशी मागणी सौंदडवासीयांनी केली आहे. (वार्ताहर)