ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला; दुसऱ्या लाटेत तब्बल ३७० जणांचा मृत्यू (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:54+5:302021-04-23T04:31:54+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात झपाट्याने झाल्याने एकट्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ४०१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला; दुसऱ्या लाटेत तब्बल ३७० जणांचा मृत्यू (डमी)
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात झपाट्याने झाल्याने एकट्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ४०१ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेत ७१ रुग्णांचा मृत्यू झाला होता; परंतु दुसऱ्या लाटेत तब्बल ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यातच तब्बल २०० जणांचे मृत्यू झाले आहेत.
ग्रामीण भागात लग्नसमारंभात मोठी गर्दी झाली. पहिली लाट ओसरल्यानंतर लोक बिनधास्त झालेत. लस आली म्हणून नागरिक निष्काळजी वागू लागल्याने ग्रामीण भागातही कोरोना झपाट्याने वाढला. शहरातील लोक असोत किंवा ग्रामीण भागातील लोक कोरोनाचे नियम न पाळता वागू लागल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झाला. परिणामी दुसरी लाट एवढी भयंकर आली की कुणाला सावरताच आले नाही. मृत्यूचे तांडव सुरू झाले, रूग्णालयात बेडची व्यवस्था नाही, ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, रुग्णांची झपाट्याने झालेली वाढ त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली. परिणामी रुग्णाच्या मृत्यूचे तांडव सुरू झाले. संचारबंदी करूनही लोक रस्त्यावर येत असल्याने कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहेत. गोंदियात ऑक्सिजनचे फक्त ९११ बेड्स आहेत.
..........
ऑक्सिजनअभावी करावा लागतो १०० किमीचा प्रवास
गोंदिया जिल्ह्यात ऑक्सिजनची सोय गोंदिया वगळता जिल्ह्यात कुठेही नाही. देवरीचा ककोडी परिसर असो किंवा अर्जुनी-मोरगावचा केशोरी परिसर असो येथील रुग्णांना ऑक्सिजनकरिता गोंदियालाच आणावे लागते. त्यामुळे कोविड रुग्णालयात येईपर्यंत रुग्णांचा मृत्यू होतो. शंभर किलोमीटर अंतरापेक्षाही जास्त अंतर कापून ऑक्सिजनकरिता रुग्णाला गोंदियाला आणावे लागते.
.......
ऑक्सिजनअभावी २४ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी ऑक्सिजनकरिता आणत असतानाच आतापर्यंत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे काही लोकांचा रुग्णालयातच मृत्यू झाला; परंतु ऑक्सिजन संपले नाही असा देखावा रुग्णालयाकडून करण्यात आला.
........
जिल्ह्यात मृत्यूचे तांडव
गोंदिया- २५६
तिरोडा-४७
गोरेगाव- १५
आमगाव-२४
सालेकसा-७
देवरी -१४
सडक-अर्जुनी-१३
अर्जुनी-मोरगाव १५
इतर राज्य/जिल्हे- १०
..........
ऑक्सिजन बेड्सची मारामार
तालुका--कोविड हॉस्पिटल--साधे बेड-- ऑक्सिजन बेड
गोंदिया---------२२-----------१२८४--------९११
तिरोडा---------६-----------२४३--------००
आमगाव---------२-----------७०--------००
सालेकसा---------१-----------३०--------००
अर्जुनी-मोरगाव----१-----------७०--------००
देवरी---------------१-----------२०-------------००
गोरेगाव-----------१-----------७०---------००
सडक-अर्जुनी---------३-----------९४--------००
..................................
तालुका--एकूण रुग्ण--सर्वाधिक रुग्ण असलेले गाव व संख्या-- कोरोनाबाधित गावे--कोरोनामुक्त गावे
गोंदिया----१५२४९------ फुलचूर /१३८------------------------------१०८---------------००
तिरोडा-----२९७६-------वडेगाव/४५---------------------------------९५----------------००
आमगाव----२१२९-------बोथली/४२----------------------------------६३--------------- ३०
सालेकसा-----९८७---------सातगाव/ ६५------------------------------६७------------१८
अर्जुनी-मोरगाव---१८५६----खांबी/५२--------------------------------१३६----------------०८
देवरी------------१२०८--------मुरमाडी/१०---------------------------१३२------------------०३
गोरेगाव---------१३४०--------घुमर्रा/१०१------------------------------९९-------------------०४
सडक-अर्जुनी---१३२९--------कोसमतोंडी/४८------------------------५९------------------५६
....................
कोट
आतापर्यंत ग्रामीण भागात ऑक्सिजनची सोय नाही; परंतु आता आम्ही अर्जुनी-मोरगाव येथे ऑक्सिजन बेडची तयारी करीत आहोत. हळूहळू मग संपूर्ण जिल्ह्यात ही सोय करण्याचा मानस आहे. परिस्थितीवर सर्व बाबी अवलंबून आहेत.
डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक, गोंदिया.