आरतीच्या कुटुंबीयांना देणार योग्य न्याय

By Admin | Updated: August 26, 2015 01:37 IST2015-08-26T01:37:24+5:302015-08-26T01:37:24+5:30

तालुक्यातील सोनारटोला येथे जाळून विहीरीत टाकण्यात आलेल्या मृत आरती बारसे हिच्या कुटुंबीयांची...

Right to the family members of Aarti | आरतीच्या कुटुंबीयांना देणार योग्य न्याय

आरतीच्या कुटुंबीयांना देणार योग्य न्याय

जि.प.अध्यक्ष : कारवाई करण्याचे निर्देश
साखरीटोला : तालुक्यातील सोनारटोला येथे जाळून विहीरीत टाकण्यात आलेल्या मृत आरती बारसे हिच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी सोमवारी (दि.२४) भेट घेतली. यावेळी योग्य न्याय देत आरोपीवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आरती बारसे हिच्या हत्येचे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव कुटुंबियांकडून घेतले जात असताना पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उषाताई मेंढे यांनी बारसे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याकडून संपूर्ण प्रकरण जाणून घेत घटनास्थळाची पाहणीही केली.
याप्रसंगी त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांशी मोबाईलवरून संवाद साधला व प्रकरणाबाबत चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना पकडून अन्यायग्रस्त कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच गरज भासल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योग्य ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी बारसे कुटुंबीयांना दिले. (वार्ताहर)

Web Title: Right to the family members of Aarti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.