शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

राखीव जागेवर श्रीमंतांची वर्णी

By admin | Updated: May 7, 2015 00:36 IST

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमात तथा गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागेवर ...

आरटीई कायद्याचे उल्लंघन : प्रकरण शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाततुमसर : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमात तथा गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागेवर श्रीमंताच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती आहे. सोडत पध्दतीला येथे फाटा देत बंद खोलीत यादीला अंतीम रुप देण्यात आले. प्रकरण तालुक्यापासून जिल्हा स्तरावर गेल्याने वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याचे समजते.शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मागास आणि आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यालयाकरिता २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. शहरातील एका नामांकित शाळेत ३० मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनिवार्य आहे. याकरिता ३७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले होते. अधिकचे अर्ज आल्याने सोडत पध्दतीने प्रवेश निश्चित करण्याचे ठरले होते. संबंधित पालकांना बोलविण्यात आले. तुमसर पंचायत समितीचे शिक्षण विभागातील अधिकारी व मुख्याध्यापकाने बंद खोलीत यादी अंतीम केली. राखीव ३० पैकी २८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दस्ताऐवज नसल्याने दोन विद्यार्थ्यांची नावे प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आली. उर्वरित सात विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत पुरेसे दस्ताऐवज जोडले नसल्याचे सांगून त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. येथे प्रत्यक्षात सोडत पध्दतीचा अवलंब केला गेला नाही हे विशेष. २८ विद्यार्थ्यांत श्रीमंत तथा व्यापाऱ्यांची मुले असल्याची तक्रार अन्यायग्रस्त पालकांनी केली आहे.पंचायत समती सभापती कलाम शेख, गटशिक्षणाधिकारी सी. आर. नंदनवार, खंडविकास अधिकारी स्रेहा कुळचे यांचेकडे तक्रार करण्यात आली. खंडविकास अधिकारी तथा सभापती कलाम शेख यांनी प्रवेश प्रक्रिया रद्द करुन नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले, पंरतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात आता प्रकरण गेले आहे.आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रीयेत घोळ प्रकरणी अत्यंत कडक नियम आहेत. गरीब व राखीव जागेवर नियमबाहय प्रवेश प्रक्रिया राबविल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे पंचायत समिती सभापती कलाम शेख यांनी लोकमतला सांगितले. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणापासून ठेवल्यास खपवून घेणार नाही असे सांगून शहरातील व परिसरातील २५ टक्के जागांची तपासणी करण्यात येईल असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)