घडीपुस्तिकेतून विकासकामांचा आढावा
By Admin | Updated: November 10, 2015 02:28 IST2015-11-10T02:28:51+5:302015-11-10T02:28:51+5:30
राज्य सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल शासनाने एका वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देणाऱ्या ...

घडीपुस्तिकेतून विकासकामांचा आढावा
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन : पहिले पाऊल वचनपूर्तीचे
गोंदिया : राज्य सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल शासनाने एका वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देणाऱ्या तसेच जिल्ह्यात अंमलबजावणी केलेल्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या सचित्र घडीपुस्तिेकेचे प्रकाशन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथे केले.
यावेळी गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष झामसिंग येरणे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत गहाणे, गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शुक्रवारी याचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. या पुस्तिकेत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामगिरीचे प्रतिबिंब उमटले असून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २५० रुपये प्रमाणे जिल्ह्यातील ३६ हजार ७६० शेतकऱ्यांना ३३ कोटी १० लाख रुपये प्रोत्साहनपर अतिरिक्त मदत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पादर्शकता आणण्यासाठी या व्यवस्थेतील त्रुटी व गैरव्यवहार दूर करण्यासाठी शिधापत्रिका बायोमेट्रिक व आधारकार्डशी जोडण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा राज्यात दुसरा असल्याची माहिती, तसेच महाराजस्व अभियानातून महसूल विभागाची कामगिरी, मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी व शेतकऱ्यांची सावकारी कर्जमुक्ती, १९ व २० मे रोजी गोंदिया येथे घेण्यात आलेला बार्टीचा मेळावा व स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबाबतची माहिती देण्यात आली. प्रथम पुष्ठावर जिल्ह्यात दुर्मिळ होणाऱ्या सारस पक्षांचे छायाचित्र वाचकांच्या लक्ष वेधून घेत आहे. या घडीपुस्तिकेमुळे अनेकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यास मदत होणार आहे.