महसूल विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 21:58 IST2018-09-12T21:57:45+5:302018-09-12T21:58:35+5:30

तहसील कार्यालयांतर्गत एकूण ४३ टक्के पदे रिक्त असल्याने महसूल विभागाच्या कामाकाजाची वाट लागली आहे. त्यामुळे सामान्य जनतेची कामे नेहमी ठप्प होत आहेत. शिवाय विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून अनेकांना रात्री उशिरापर्यंत कमे करावी लागत आहेत.

Revenue Department receives vacant posts | महसूल विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

महसूल विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

ठळक मुद्देएकूण ४३ टक्के पदे रिक्त : कामकाजावर मोठा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तहसील कार्यालयांतर्गत एकूण ४३ टक्के पदे रिक्त असल्याने महसूल विभागाच्या कामाकाजाची वाट लागली आहे. त्यामुळे सामान्य जनतेची कामे नेहमी ठप्प होत आहेत. शिवाय विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून अनेकांना रात्री उशिरापर्यंत कमे करावी लागत आहेत.
तालुक्यात एकूण १७ तालठ्यांसह तहसील कार्यालयात ४६ पदे मंजूर आहेत. यात एक तहसीलदार, चार नायब तहसीलदार, सहा अव्वल कारकून, १० कनिष्ठ लिपीक, एक चौकीदार यांचा समावेश आहे.
यामध्ये नायब तहसीदारांसह तलाठी आणि इतर ४२ पदांपैकी एकूण १८ पदे रिक्त आहेत. त्यानुसार एकूण ४३ टक्के पदे रिक्त असल्याने संपूर्ण महसूल विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. नायब तहसीलदारांचे एकूण चार पैकी तीन पद भरले असून एक पद रिक्त आहे. अव्वल कारकून चे सहा पैकी तीन पद भरले असून तीन पद रिक्त आहेत. कनिष्ठ लिपीकाचे १० पैकी सहा पद रिक्त आहगेत. चौकीदाराचे एक पद असून तेही रिक्त आहे. शिपायीचे चार पदे असून एक पद रिक्त आहे.
त्यालुक्यात एकूण १७ तलाठी साझे असून पाच ठिकाणी तलाठीच नसून इतर ठिकाणच्या तलाठ्यांना अतिरीक्त जबाबदारी देण्यात आली आहे. सालेकसा तालुका आर्थिक दृष्टया मागासलेला असून नक्षलग्रस्त संवेदनशील आहे.
या तालुक्यात एकीकडे शेती व वन जमिनीचे प्रकरण महसूल विभागात निर्माण होत असतात. अशात महसूल विभागात कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने कामावर मोठा परिणाम पडत आहे.
कंत्राटींच्या भरवशावर तहसील कार्यालय
तहसील कार्यालयात काम धुरा मोठ्या प्रमाणात लिपीकांच्या खांद्यावर असून दुर्देव असे की यातील ६० टक्के पद रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा बोजा आता कंत्राटी कर्मचाºयांवर असून सध्या संपूर्ण तहसील कार्यालय कंत्राटी कर्मचाºयांच्या भरवशावर चालत असताना दिसत आहे.

Web Title: Revenue Department receives vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.