दिलेली जमीन परत करा

By Admin | Updated: May 14, 2015 00:49 IST2015-05-14T00:49:08+5:302015-05-14T00:49:08+5:30

तालुक्यातील भजीयापार येथील ४१ कुटुंबातील शेतकऱ्यांना नोकरीचे आमिष तसेच गौशाळा विकासाच्या भूलथापा देत ...

Return the land given | दिलेली जमीन परत करा

दिलेली जमीन परत करा

शेतकऱ्यांची मागणी : पत्रपरिषदेतून दिला आत्महत्येचा इशारा
आमगाव : तालुक्यातील भजीयापार येथील ४१ कुटुंबातील शेतकऱ्यांना नोकरीचे आमिष तसेच गौशाळा विकासाच्या भूलथापा देत पाऊलदौना येथील ग्रामोस्थान संस्थेने शेतकऱ्यांकडून ६.३९ हे.आर. जमीन दान स्वरूपात मिळविली. परंतु सलग २९ वर्षापर्यंत कोणताच विकास किंवा केलेला करार पूर्ण न करता या जमिनीपासून खासगी उत्पन्न मिळविण्यासाठी गौण खनीज अवैधपणे काढले जात आहे. त्यामुळे दान स्वरूपात दिलेली जमीन परत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारला असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
भजियापार येथील शेतकऱ्यांना गौविकास, गावविकास तसेच नोकरीचे आमिष देत ग्रामोस्थान संस्थेच्या संचालकांनी शेतकऱ्यांकडून जवळपास १६ एकर जमीन सन १९८६ मध्ये दान स्वरूपात मिळवून घेतली. परंतु या जमिनीचा कोणताच विकास संस्थेने केला नाही. तर सलग २९ वर्षांपर्यंत कागदावर उपयोग घेऊन शेतकऱ्यांना मिळत असलेल्या उत्पन्नावरही डल्ला मारला. शेतकऱ्यांकडून मिळविलेली जमीन हातातून जाऊ नये यासाठी संचालकांनी जमीन घेताना शेतकऱ्यांना विविध आमीष दिले. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांना हातातून गेलेल्या जमीनीमुळे आर्थिक समस्यांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोणताच विकास न झालेली जमीन हक्काने परत मिळावी यासाठी संस्थेकडे सन २००८ मध्ये रितसर अर्ज केले.
परंतु संस्था संचालकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु ठेवली. यामुळे हलाखीचे जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांपुढे उत्पन्नाअभावी मरणासन्न परिस्थिती पुढे आली. शेतजमीन परत मिळविण्यासाठी त्यांनी संस्थेकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने आता शासनाकडे धाव घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर जमीन परत न मिळाल्यास ४१ शेतकरी कुटुंबीयांनी आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

शेतकऱ्यांच्या जमिनी परत करू : शिवणकर
ग्रामोस्थान संस्थेने शेतकऱ्यांच्या जमिनी दान स्वरूपात घेतल्या. परंतु या जमीनीवर कोणताच विकास झाला नाही. शेतकऱ्यांनी संस्थेकडे व धर्मदाय आयुक्त विभागाकडे रितसर अर्ज करावे त्यांच्या जमीनी परत करू असे मत ग्रामोस्थान संस्थेचे अध्यक्ष व माजी वित्तमंत्री प्रा. महादेवराव शिवणकर यांनी प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.

Web Title: Return the land given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.