गुलाब लिल्हारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:32 IST2021-03-09T04:32:25+5:302021-03-09T04:32:25+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष इंद्रपालसिंह नागपुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव प्रा. किशोर नागपुरे, माजी सहसचिव दुर्गेश लिल्हारे, सरपंच ...

Retirement of Gulab Lilhare () | गुलाब लिल्हारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार ()

गुलाब लिल्हारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार ()

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष इंद्रपालसिंह नागपुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव प्रा. किशोर नागपुरे, माजी सहसचिव दुर्गेश लिल्हारे, सरपंच संगीता कुराहे, उपसरपंच प्रेमलता देशमुख, ग्रा. पं. सदस्य जयराम मच्छिरके, कुंभरे, पोलीस पाटील लक्ष्मीनारायण चुटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष भुमेश्वर मच्छिरके, झनक लिल्हारे, प्रभारी मुख्याध्यापक पालकराम वालदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली. लिल्हारे यांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक शिक्षक ए. आर. नागपुरे, एस. टी. उपराडे, एस. जी. टेंभुर्णीकर, संस्थाध्यक्ष इंद्रपाल नागपुरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डी. वाय. भोयर यांनी केले. आभार कुंती मच्छिरके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डी. एस. लिल्हारे, के. एस. नागपुरे, डी. जी. दमाहे, प्रा. व्ही. डी. मेश्राम, प्रा. एम. जी. नागपुरे, प्रा. डी. पी. नागपुरे, विठ्ठल नागपुरे, एम. जी. मच्छिरके, टी. डी. सांगोडे, डी. एस. मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: Retirement of Gulab Lilhare ()