सेवानिवृत्त कर्मचारी वर्षभरापासून पेन्शनविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:34 IST2021-08-25T04:34:45+5:302021-08-25T04:34:45+5:30
तिरोडा : येथील तहसील आस्थापनेमधून मंडल अधिकारी बी. एस. दाते आणि अव्वल कारकून सी. ए. बिसेन सन २०२० मध्ये ...

सेवानिवृत्त कर्मचारी वर्षभरापासून पेन्शनविना
तिरोडा : येथील तहसील आस्थापनेमधून मंडल अधिकारी बी. एस. दाते आणि अव्वल कारकून सी. ए. बिसेन सन २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटूनही त्यांना सेवानिवृत्ती पेन्शन योजना सुरू झाली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
तहसीलदार प्रशांत घोरुडे यांचे आपल्या आस्थापनेवर लक्ष नसल्यामुळे कार्यालयीन कामांमध्ये दप्तर दिरंगाई होत असल्याची बाब उघड होत आहे. सेवानिवृत्ती पेन्शन मिळावी, यासाठी या कर्मचाऱ्यांना आपल्याच कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. अवैध उत्खननाकडे तहसीलदारांनी लक्ष दिलेच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्याच कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या पेन्शनकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून कुटुंबाचा कोंडमारा होणार नाही, अशी मागणी सेवानिवृत्तांनी केली आहे. विशेष म्हणजे, प्रकरणासंबंधाने तहसीलदारांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता तक्रार ऐकून त्यांनी कॉल कट केला.