मृत्यूनंतर पती-पत्नीचा देहदानाचा संकल्प
By Admin | Updated: May 12, 2015 01:38 IST2015-05-12T01:38:34+5:302015-05-12T01:38:34+5:30
रिसामा येथील माजी प्राचार्य श्यामराव बहेकार यांचा लग्नाच्या ५५ व्या सोहळ्यात उपस्थित मान्यवर व मुलांच्या

मृत्यूनंतर पती-पत्नीचा देहदानाचा संकल्प
रिसामा येथील दाम्पत्य : लग्नाच्या ५५ व्या वाढदिवशी घेतला निर्णय
ंआमगाव : रिसामा येथील माजी प्राचार्य श्यामराव बहेकार यांचा लग्नाच्या ५५ व्या सोहळ्यात उपस्थित मान्यवर व मुलांच्या उपस्थितीत श्यामराव व सुशीला बहेकार या दाम्पत्याने मनोपरांत देहदानाचा संकल्प जाहीर केला.
लग्नाच्या ५५ वा वाढदिवस रविवारी १० मे रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या सालेकसा मार्गावरील राहत्या घरी असंख्य चाहत्यांनी साजरा केला. या वेळी बहेकार यांनी मरणोपरांत पती-पत्नीचा देहदान देण्याचा संकल्प जाहीर केला. यावेळी दीप प्रज्वलन करुन पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार गीताचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला सुरेश, विजय व संजय ही तिन्ही मुले उपस्थित होते. तसेच जयश्री, कल्पना, अरुणा या तिन्ही सुनांनी आपली हजेरी लावली. कार्यक्रमाला गीता शिवणकर, पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, माया खराबे, यशवंतराव बागडे, अॅड. जसवंतराव, गंगाबाई, केशव थेर, नंदू मुनेश्वर, खुशाल ब्राह्मणकर, राधाकृष्ण मंदिराचे ठाकरे, माजी प्राचार्य सोमवंशी, आर्य समाज संयोजक हत्तीमारे, गंगाधर शिवणकर, राजकुमार कोरे, मंजुळा बहेकार, चेतनसिंह सोमवंशी यांनी बहेकार पती-पत्नीचा सत्कार केला. संचालन माजी प्राचार्य पुरुषोत्तम सोमवंशी व आभार सत्कारमूर्ती श्यामराव बहेकार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
नाल्यांच्या सफाईची मागणी
गोंदिया : बाजार परिसरातील नाल्या सफाईअभावी चोक पडल्या असून सांडपाण्याने तुंबलेल्या आहेत. यामुळे दुर्गंध पसरला असून नागरिकांना वावरताना त्रास होत आहे. शिवाय दुकानदारांनाही नाक दाबण्याची पाळी आली आहे. एकंदर तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक ांच्या आरोग्यावरही परिणाम हेत असून नागरिकांत रोष व्याप्त आहे. पालिकेने लक्ष देत नाल्यांची सफाई करण्याची मागणी जोर धरत आहे.