सोमवारपासून होणार निर्बंध शिथिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:00 AM2021-07-30T05:00:00+5:302021-07-30T05:00:02+5:30

मागील दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले, तर अजूनही काही प्रमाणात निर्बंध लागू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता संसर्ग आटोक्यात आला असून, निर्बंध शिथिल करून सर्वच दुकाने सकाळी ८ ते रात्री ९ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी गोंदिया येथील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तर आता शासनसुद्धा यावर अनुकूल असून, सोमवारपासून निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे वार्तने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

Restrictions to be relaxed from Monday! | सोमवारपासून होणार निर्बंध शिथिल !

सोमवारपासून होणार निर्बंध शिथिल !

Next
ठळक मुद्देहालचालींना आला वेग : शनिवार, रविवारी राहणार कायम; दिलासादायक संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात सर्वत्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. गोंदिया जिल्हासुद्धा कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळेच शासनाने सोमवारपासून कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून करण्यात येणार असून, त्या दृष्टीने जिल्हास्तरावर हालचाली सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच डेल्टा व डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यापासून काही प्रमाणात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लागू केले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्वच वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र आता सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असून, सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहे तर जिल्ह्यात केवळ दहा कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, चार तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे तर उर्वरित चार तालुक्यात एक दोनच रुग्ण आहेत. एकंदरीत जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल आहे. 
ही सर्व परिस्थिती पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांनीसुद्धा कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, तर राज्यस्तरावरसुद्धा व्यापारी संघटनांनी शासनाकडे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यामुळेच राज्य सरकारसुद्धा यावर अनुकूल असल्याची माहिती आहे. काही मंत्र्यांनीसुद्धा गुरुवारी (दि. २९) सोमवारपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भातील आदेश अद्याप प्राप्त झाले नाही. मात्र शुक्रवारी आदेश प्राप्त होताच त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले. 

व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण 
- मागील दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले, तर अजूनही काही प्रमाणात निर्बंध लागू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता संसर्ग आटोक्यात आला असून, निर्बंध शिथिल करून सर्वच दुकाने सकाळी ८ ते रात्री ९ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी गोंदिया येथील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तर आता शासनसुद्धा यावर अनुकूल असून, सोमवारपासून निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे वार्तने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

 गर्दी कमी करण्यास होणार मदत 
- सध्या सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवली जातात. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र होते. मात्र सोमवारपासून निर्बंध शिथिल झाल्यास बाजारपेठेत होणारी गर्दी वेळेत वाढ झाल्यामुळे कमी करण्यास मदत होणार आहे. 

 शनिवार, रविवार पूर्णपणे बंद
- सोमवारपासून कोरोनाचे निर्बंध शिथिल होण्याचे संकेत शासनाने दिले आहे. मात्र शनिवार आणि रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती आहे. मात्र यासंदर्भातील परिपत्रक आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: Restrictions to be relaxed from Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app