भ्रूणहत्या थांबविणे समाजाची जबाबदारी

By Admin | Updated: October 26, 2016 02:36 IST2016-10-26T02:36:44+5:302016-10-26T02:36:44+5:30

तिरोडा लॉयनेस क्लब व युवा महिला संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बेटी बचाव कार्यक्रमात भू्रणहत्या थांबविणे ही समाजाची जबाबदारी आहे,

The responsibility of society to stop feticide | भ्रूणहत्या थांबविणे समाजाची जबाबदारी

भ्रूणहत्या थांबविणे समाजाची जबाबदारी

परसवाडा : तिरोडा लॉयनेस क्लब व युवा महिला संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बेटी बचाव कार्यक्रमात भू्रणहत्या थांबविणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे मत तिरोडा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष ममता बैस यांनी व्यक्त केले.
बेटी बचाव, कन्या भ्रुणहत्या थांबवा व महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सेल्फी स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
मुलींची भ्रूणहत्या थांबविणे काळाची गरज आहे. महिलांवर होणारे अत्याचार दूर करण्यासाठी जोपर्यंत समाजातील प्रत्येक पुरूष किंवा महिला आपली मानसिकता बदलविणार नाही, तोपर्यंत भु्रणहत्या थांबणार नाही. त्यासाठी सर्व महिलांनी आपली जबाबदारी समजून घेणे, काळाची गरज आहे. महिलांनी पक्का निर्धार केला तर कुणाचीही हिंमत स्त्री भु्रणहत्येसाठी होणार नाही. पण आम्ही भावनेच्या भरात मुलासाठी मुलीची भ्रूणहत्या करण्याचे पातक करतो. हे पाप करणे थांबविण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे ममता बैस म्हणाल्या. समाजसेविका सविता बेदरकर यांनीसुद्धा या वेळी मार्गदर्शन केले. त्यांनी स्त्रियांवरील अत्याचार का होतात, त्याचा सामना कसा करावा, महिलांनी काय करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
संचालन अर्चना नखाते यांनी केले. आभार अ‍ॅड. माधुरी रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शीतल तिवडे, रूबिना कुरेशी, शीला अंबुले, पौर्णिमा भाले, संगीता हिरापुरे, डॉ. हर्षा हिंदूजा, योगिता घोडमारे, वनमाला डाहाके व सर्व युवा महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: The responsibility of society to stop feticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.