संक्रांत मेळाव्याला सखींचा प्रतिसाद

By Admin | Updated: February 2, 2016 01:43 IST2016-02-02T01:43:39+5:302016-02-02T01:43:39+5:30

लोकमत सखी मंच व आज इंस्टीट्यूट यांच्या संयुक्तवतीने संक्रांतीचे निमित्त साधून शनिवारी (दि.३०) आज सभागृहात संक्रांत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

The response of the Sankranta rally to the audience | संक्रांत मेळाव्याला सखींचा प्रतिसाद

संक्रांत मेळाव्याला सखींचा प्रतिसाद

गोंदिया: लोकमत सखी मंच व आज इंस्टीट्यूट यांच्या संयुक्तवतीने संक्रांतीचे निमित्त साधून शनिवारी (दि.३०) आज सभागृहात संक्रांत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गर्ल्स कॉलेजच्या प्रा.माधुरी नासरे, सीमा डोये, सामाजीक कार्यकर्त्या सविता बेदरकर, नगरसेविका भावना कदम, लोकमत इव्हेंटच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत, आज इंस्टीट्यूटच्या संचालिका मंजू कटरे उपस्थित होत्या.
या मेळाव्यात सखींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात उखाने, फॅशन शो (थिम ब्लॅक),इंट्रोडक्शन राऊंड यांचा समावेश होता. स्पर्धेत सखींनी भाग घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे मराठी भाषी महिलांसह हिंदी भाषी महिलांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी प्रा.नासरे यांनी, महिलांना मकर संक्रांती व त्याचे महत्व याबद्दल माहिती दिली. तर मंजू कटरे यांनी, गोंदिया जिल्हा हा मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या मधात असल्याने हिंदी संस्कृती व हिंदी भाषेचा प्रभाव इकडे दिसतो. पण असा स्पर्धांकडे मराठी भाषींसहीत हिंदी भाषी लोकांनाही मराठी संस्कृतीची ओळख होत असल्याचे सांगीतले.
दिव्या भगत यांनी, लोकमत सखी मंचच्या माध्यमातून वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या मेळाव्यात सखींसह प्रेक्षकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व त्यात त्यांनी उत्सफुर्तपणे भाग घेतला होता. प्रास्तावीक दिव्या भगत यांनी केले. संचालन काव्या केहता व दिपीका ससानी यांनी केले. आभार मंजू कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रविना पराते, नेहा करमकर यांच्यासह अन्य सखींनी सहकार्य केले.
सखींचे हळदीकुं कू
देवरी: येथील आफताब मंगल कार्यालयात सखींचा हळदीकुंकू कार्यक्रम नुकताच थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे निमित्त साधून सखींसाठी फँसी ड्रेस ्स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुमन बिसेन, माया निर्वाण, कोकीळा दखने, नगरसेवीका उषा शहारे, सामाजीक कार्यकर्ता सविता बेदरकर, लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका शिप्रा तिराले उपस्थित होत्या. कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या व त्यात ममता इरदंडे यांनी प्रथम, मयुरी पारधी यांनी द्वितीय तर रोहीनी कावळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान हळदीकुंकू व वाण देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
संचालन स्मिता पिल्लेवार व सोनिया मारे यांनी केले. प्रास्तावीक लोकमत सखी मंच संयोजिका शिप्रा तिराले यांनी मांडले. आभार ममता इरदंडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The response of the Sankranta rally to the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.