आईस्क्रीम बनवा कार्यशाळेला प्रतिसाद
By Admin | Updated: May 19, 2016 01:27 IST2016-05-19T01:27:40+5:302016-05-19T01:27:40+5:30
लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक दुर्गा मंदिर सभागृहात आईस्क्रीम मेकिंग कार्यशाळा घेण्यात आली.

आईस्क्रीम बनवा कार्यशाळेला प्रतिसाद
सडक अर्जुनी : लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक दुर्गा मंदिर सभागृहात आईस्क्रीम मेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य विना राऊत उपस्थित होत्या. कार्यशाळेत वेनिला, पॉडनेट, बटरस्कॉच अशा विविध आईस्क्रीमचे प्रशिक्षण देण्यात आले. आईस्क्रीम मेकींग प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया येथील कल्पना पटेल उपस्थित होती. संचालन संयोजिका हर्षा राऊत यांनी केले. यशस्वीतेसाठी सखी मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
देवरी : लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक आफताफ मंगल कार्यालयात आईस्क्रीम मेकिंग कार्यशाळा घेतली. कार्यक्रमाची सुरुवात लोकमत सखी मंचच्या संस्थापीका ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने करण्यात आली.
सदर कार्यशाळेत विविध प्रकारचे शरबत व आईस्क्रीम बनविण्याचे प्रशिक्षण सखींना देण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया येथील कल्पना पटेल उपस्थित होत्या. संचालन संयोजिका शिप्रा तिराले यांनी केले. यशस्वितेसाठी सोनीया माटे, स्मीता पिल्लेवार, पुष्पा अदमने, माधुरी पारधी, गायत्री पारधी, पुष्पा कानेकर, रोहिणी कावळे, लक्ष्मी पंचमवार, कुंदा धुर्वे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)