जिल्हाभरातून सामान्य ज्ञान परीक्षेला प्रतिसाद

By Admin | Updated: November 19, 2016 00:44 IST2016-11-19T00:44:37+5:302016-11-19T00:44:37+5:30

लोकमत सखी मंचतर्फे जिल्हाभरात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेला सखींची चांगलाच प्रतिसाद दिला.

Respond to General Knowledge Test from District | जिल्हाभरातून सामान्य ज्ञान परीक्षेला प्रतिसाद

जिल्हाभरातून सामान्य ज्ञान परीक्षेला प्रतिसाद

गोंदिया : लोकमत सखी मंचतर्फे जिल्हाभरात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेला सखींची चांगलाच प्रतिसाद दिला.
देवरी
लोकमत सखी मनच देवरीतर्फे स्थानिक धुकेश्वरी सभागृहात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण ५० सखी सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत गणित, विज्ञान, इतिहास अशा विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. यात प्रथम क्रमांक ज्योती रामटेककर, द्वितीय क्रमांक डिलेश्वरी बिंझाडे तर तृतीय क्रमांक गायत्री पारधी यांनी मिळविला. विजयी स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन स्मिता पिल्लेवार यांनी केले. आभार लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका शिप्रा तिराले यांनी मानले. कार्यक्रमासाठी लता बडोले, सोनिया माटे, पुष्पा कानेकर, मयूरी पारधी, रूपाली शाहू यांनी सहकार्य केले.
सालेकसा
लोकमत सखी मंच सालेकसाच्या वतीने स्थानिक जानकीबाई विद्यालय येथे सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यात एकूण ४० सखी सहभागी झाल्या. यात प्रथम क्रमांक रेखा टेंभरे, द्वितीय क्रमांक प्रीती माहुर्ले तर तृतीय क्रमांक तृप्ती गाढवे यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका जांगडे, शिक्षक-कर्मचारी आदिंनी सहकार्य केले. परीक्षण किरण मोरे व पराग फुंडे यांनी केले.
तिरोडा
लोकमत सखी मंच तिरोड्याच्या वतीने स्थानिक राजीव गांधी आयटीआय येथे सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यात ६० सखींनी भाग घेतला. यात प्रथम क्रमांक सुलभा तितिरमारे, द्वितीय क्रमांक लीना कावडकर व तृतीय क्रमांक अभिलाषा गेडाम यांनी मिळविला. सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संचालन संयोजिका ममता दुबे यांनी केले. आभार आयटीआय संचालिका अर्चना नखाते यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. प्रमोद पारधी, प्रशांत टेंभरे, विजय पारधी, विलास बिसेन, किशोर लाडे यांनी सहकार्य केले.
सडक-अर्जुनी
लोकमत सखी मंच सडक-अर्जुनीच्या वतीने स्थानिक एम.बी. पटेल महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यात ७० सखी सहभागी झाल्या.
सखी मंचच्या सदस्यांना सुरूवातीला स्पर्धा परीक्षेबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संबंधित साहित्य पुरविण्यात आले. सदर परीक्षा शांततामय वातावरणात पार पडल्याचे सांगण्यात आले.
प्रथम क्रमांक उषा जगताप, द्वितीय क्रमांक शीतल खोब्रागडे यांनी मिळविला. स्पर्धा परीक्षण हर्षा राऊत व लतिका कोटांगले यांनी केले. बक्षीस वितरण जि.प. सभापती वंदना डोंगरवार यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन हर्षा राऊत यांनी केले. आभार ज्योती बडोले यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Respond to General Knowledge Test from District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.