शिक्षकांच्या समस्या निकाली काढा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST2021-09-22T04:32:37+5:302021-09-22T04:32:37+5:30
गोंदिया : जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे शिक्षक भारतीच्यावतीने भारताचे संविधान व अभिनंदन पत्र देऊन ...

शिक्षकांच्या समस्या निकाली काढा ()
गोंदिया : जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे शिक्षक भारतीच्यावतीने भारताचे संविधान व अभिनंदन पत्र देऊन स्वागत करण्यात आले, तसेच जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढा, अशी मागणी करीत त्यांना निवेदन देण्यात आले. यावर शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सभा लावून तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन मुकाअ पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.
निवेदनात, शिक्षकांचे २ वर्षांपासून प्रलंबित असलेले कायमचे प्रकरण निकाली काढणे, शिक्षकांची यादी प्रकाशित करून समुपदेशनातून तत्काळ रिक्त पदे भरणे, प्रलंबित निवडश्रेणी व चट्टोपाध्याय प्रकरणाची दुसरी यादी प्रकाशित करणे, आदिवासी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत एकस्तराचा लाभ मिळावा, डीसीपीएस-जीपीएफ कपातीचा आजपर्यंतचा हिशेब देणे, डीसीपीएस मृत शिक्षकांना शासन निर्णयानुसार १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी, नक्षल भत्ता १५०० रुपये लागू करणे, थकबाकी काढणे, मृत डीसीपीएस बांधवांच्या कुटुंबीयांना केंद्राप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे, १४ व्या वित्त आयोगातून शाळेचे वीज बिल भरण्यात यावे, संगणक अर्हता विहित मुदतीत सादर न केलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची वसुली रक्कम परत देऊन आता सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांची संपूर्ण रक्कम परत करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश मागण्या निकाली काढल्या जातील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, विभागीय उपाध्यक्ष गुलाब मौदेकर, जितेंद्र घरडे, महेंद्र सोनवाने, संतोष डोंगरे, ओ.एस.गुप्ता, रामभगत पाचे, नलिनी नागरीकर, संतोष मेंढे, मानिकचंद बिसेन, एस.टी.बावनकर, नागेश खांडेकर, भंडारी चौधरी, श्याम बावने यांचा समावेश होता.