पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST2021-09-16T04:36:11+5:302021-09-16T04:36:11+5:30
इंदोरा बुजरुक : तिरोडा पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी लिल्हारे यांना १४ सप्टेंबर रोजी झालेल्या पेन्शन अदालतमध्ये कास्ट्राईब कर्मचारी ...

पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा ()
इंदोरा बुजरुक : तिरोडा पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी लिल्हारे यांना १४ सप्टेंबर रोजी झालेल्या पेन्शन अदालतमध्ये कास्ट्राईब कर्मचारी महासंघ शाखा तिरोडा व कास्ट्राईब शिक्षक संघटना तिरोडाच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त मागासवर्गीय कर्मचारी शिक्षक व अधिकाऱ्यांचे उपदान, अंश राशिकरण रजा, रोखीकरण, गटविमा, भविष्यनिर्वाह निधी, प्रवासभत्ता बिल व इतर वेतन भत्ते तातडीने देण्यात यावे, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना तातडीने एक रकमी पेन्शन देण्यात यावी, सेवानिवृत्तीच्या पहिला व दुसरा हप्ता रोखीने देण्यात यावा, आदी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व सोडविण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी लिल्हारे यांनी दिले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना तिरोडाचे तालुका अध्यक्ष संजय मेश्राम व त्यांचे सहकारी यांनी निवेदन दिले. सहायक प्रशासन अधिकारी पी.एफ.बन्सोड उपस्थित होते.