पत्रकारांच्या समस्या सोडवू
By Admin | Updated: January 31, 2015 01:46 IST2015-01-31T01:46:20+5:302015-01-31T01:46:20+5:30
स्वातंत्र्यानंतर मीडियाचे स्वरूप बदलले. तरी पत्रकारांच्या स्थितीत फारसे बदल झाले नाही. खरी पत्रकारिता करणारा पत्रकार आजही उपेक्षितच आहे.

पत्रकारांच्या समस्या सोडवू
गोंदिया : स्वातंत्र्यानंतर मीडियाचे स्वरूप बदलले. तरी पत्रकारांच्या स्थितीत फारसे बदल झाले नाही. खरी पत्रकारिता करणारा पत्रकार आजही उपेक्षितच आहे. हे चित्र बदलविण्यासाठी शासनाच्या मदतीने पुढाकार घेणार, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभाात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अल्ताफ शेख, अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव व भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्याच्या व्यक्तीला १५ वर्षांनंतर पालकमंत्रीपद मिळाल्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाच्या पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य व बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्काराने सन्मानित सावन डोये,मिलन लिल्हारे यांना समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल, लोकमतचे उपसंपादक नरेश रहिले, प्रा.एच.एच. पारधी, लोकमत समाचारचे प्रतिनिधी संतोष शर्मा यांना तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संजय राऊत, संचालन एच.एच. पारधी यांनी तर आभार खेमेंद्र कटरे यांनी मानले.
यावेळी दिलीप लिल्हारे, महेंद्र बिसेन, विकास बोरकर, रवी आर्य, जयंत शुक्ला, अपूर्व मेठी, विजय लाटा, शफी मेनन, जयंत मुरकुटे, बाबा शेख, रवी सपाटे, राजन चौबे, भागचंद रहांगडाले, मनोहर शेंडे, हरीष मोटघरे, हरिष भुते, आशिष पाऊलझगडे, डॉ. सुवर्णा हुबेकर, सविता तुरकर, उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)