सरकारच्या जनविरोधी धोरणाचा प्रतिकार करा

By Admin | Updated: March 3, 2016 01:50 IST2016-03-03T01:50:34+5:302016-03-03T01:50:34+5:30

काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा सतत प्रतिकार करीत भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणा,

Resolve the anti-people policies of the government | सरकारच्या जनविरोधी धोरणाचा प्रतिकार करा

सरकारच्या जनविरोधी धोरणाचा प्रतिकार करा

काँग्रेस कमिटीची सभा : आदिवासी नेते कोरोटे यांचे आवाहन
सालेकसा : काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा सतत प्रतिकार करीत भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणा, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा आदिवासी नेता सहेषराम कोरोटे यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना केले ते शंकरलाल अग्रवाल महाविद्यालयात आयोजित तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन गोंदियाचे आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष बाबा कटरे होते. यावेळी माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे, जि.प.सदस्य लता दोनोडे, जि.प.सदस्य विजय टेकाम, पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, पं.स.दिलीप वाघमारे, भरत लिल्हारे, अर्चना राऊत, तालुकाध्यक्ष अनिल फुंडे, लखन अग्रवाल, नामदेव कटरे, कैलाश अग्रवाल, उदराज सोनवाने, मधुकर ओकटे, हरिभाऊ घासले, संतोष पंधरे, तेजलाल पटले, सावजी भोयर, दिलीप फुंडे, वासुदेव चुटे, संजु दोनोडे, विनय शर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी गोपाल अग्रवाल, बाबा कटरे, भरत बहेकार यांनी संघर्ष मजबूत करण्यासंबधीत समयोचित मार्गदर्शन केले. तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Resolve the anti-people policies of the government